Holi Vulgar Celebration Viral Video: वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी सुरु झालेली होळीच्या परंपरेकडे अन्य अनेक सण उत्सवांप्रमाणे पार्टीचं निमित्त म्हणून पाहिलं जात आहे. बुरा ना मानो है होळी आहे या एका वाक्याने जणू काही आपल्याला मनाला वाटेल तसं वागण्याची मुभा दिलीये असा अनेकांचा समज झालाय. ही मानसिकता दाखवणारे काही व्हिडीओ आज धुलीवंदनाच्या दिवशी ऑनलाईन चर्चेत आले आहेत. राधा- कृष्णाची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मथुरेतील एका होळीच्या पार्टीत मद्यधुंद व्यावसायिकांचे विचित्र सेलिब्रेशन सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये काही बांधकाम व्यावसायिक महिला डान्सरसह अश्लील वर्तणूक करताना दिसत आहेत. यावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यावर आता पोलिसांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नेमक्या या आक्षेपार्ह्य व्हिडीओमध्ये असं काय दिसतंय व त्यावर पोलिसांचं काय मत आहे हे पाहूया..

होळीच्या दिवशी व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये बांधकाम व्यावसायिक एका महिलेसह नाचताना आणि तिला अश्लील पद्धतीने स्पर्श करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये नाचताना दिसणारी महिला ही परदेशी असल्याचे म्हटले जात आहे, तर हे व्यावसायिक मद्यधुंद स्थितीत तिच्याबरोबर नाचत आहेत. प्राप्त माहितीनुसार, सदर घटना ही मथुरेत घडली असून वृंदावन येथील ओमेक्स सिटीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे समजतेय. कृष्णाच्या भक्तांसाठी मथुरा, वृंदावन या पवित्र स्थानांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पौराणिक कथांमध्ये सुद्धा या शहरांचा उल्लेख आढळतो. त्यामुळे कृष्णाच्या मथुरेत अशी विडंबना पाहून लोकांनी साहजिकच संताप व्यक्त केला आहे.

Krishna Janmabhoomi case mathura
‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
solapur lok sabha marathi news, ram satpute latest news in marathi
सोलापूरमध्ये धर्मगुरू, मठाधीशांच्या आशीर्वादासाठी उमेदवारांचा आटापिटा
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप

पोलिसांनी काय सांगितलं?

हे ही वाचा<< “अंग लगा दे रे, मोहे रंग…”, मेट्रोमध्ये तरुणींच्या अश्लील डान्समुळे ओशाळले प्रवासी! Viral Video पाहून संतापले नेटकरी

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर काही वापरकर्त्यांनी या व्हायरल व्हिडिओला पोस्ट करत मथुरा पोलिसांना टॅग केले होते. यानंतर मथुरा पोलिसांनी X (पूर्वी ट्विटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या) एका पोस्टमध्ये या घटनेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. पोलिसांनी सांगितले की, “हा कार्यक्रम परवानगीशिवाय आयोजित करण्यात आला होता. अश्लील नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर संबंधित कलमांच्या अंतर्गत आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. लवकरच योग्य कारवाई केली जाईल.”