Viral video: कोकणकरांचा जिव्हाळ्याचा सण म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सव म्हटला की, मुंबईत स्थायिक झालेल्या मूळच्या कोकणवासीयांना शिमगा आणि गणेशोत्सवाकरिता गावाला जाणयाची ओढ लागते. ज्या व्यक्तीचे बालपण कोकणात गेले असेल, ती व्यक्ती या उत्सवाच्या वेळी जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरी त्याचे पाय गावाच्या गणपतीकडे आपोआप वळतात. कोकणातील गणेशोत्सव कुटुंबाला बांधणारा, रक्ताची नाती जवळ आणणारा, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा आहे. पाहुणे, मुलांची धमाल, जुन्या-नव्या पिढीसोबत गप्पा, नाच-गाण्यांच्या कार्यक्रमांची जागरणे, सासर-माहेरची माणसे एकत्र येणे, असा या सणाचा सोहळा असतो. याच पार्श्वभूमीवर आता कोकणातील काही महिलांचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, “कोकणचा रुबाब भारी.”

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सहा तरुणी हिरव्यागार शेतात डान्स करीत आहेत. या तरुणींनी साड्या नेसून, वेगवेगळ्या स्टेप्सद्वारे केलेेल्या डान्सने सगळ्यांची मने जिंकली आहेत. या तरुणींनी “कोकणचो रुबाब भारी, माझ्या कोकणचो तोरो भारी, कोकण चिपळूण-सावंतवाडी माझ्या कोकण गावाचो दिमाख भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी, माझ्या कोकणावाटे तुम्ही वलवा गाडी. दमादमानं हाका गाडी, माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी. मुंबई-पुण्याचे रस्ते सोडा माझ्या कोकणावाटे तुम्ही वलवा गाडी” या गाण्यावर त्यांनी हा भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही या तरुणींचे कौतुक कराल एवढे नक्की. लाखो लोकांनी पाहिलेला हा व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल, तर लगेच पाहा.

सार्वजनिक ठिकाणी रील्स बनवून प्रसिद्ध होण्यासाठी तरुण-तरुणी प्रयत्न करीत असतात. मात्र, या तरुणींनी आपल्या गावी, हिरव्यागार शेतात हा डान्स करून सगळ्यांंची मने जिंकली आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “काळ्या काळ्या मातीत झुलणाऱ्या शेतात बहरून आले जणू” आजीनं नववारी नेसून खोल तळ्यात मारला सूर; VIDEO पाहून व्हाल अवाक्

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर bollyhopdancestudio2023 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांंगलाच पसंतीस उतरला आहे. अनेकांनी या तरुणींचे कौतुक करीत व्हिडीओ शेअर करण्यास सुरुवात केली आहे. डान्स करायला धाडस लागते, असे म्हणत अनेकांनी त्यांच्या या डान्सला दाद दिली आहे.