लांबच्या प्रवासादरम्यान अनेकदा आपल्याला मळमळते, चक्कर येते किंवा उलटीसुद्धा होते. तर यादरम्यान आपण सगळेच उलटीची गोळी किंवा चॉकलेट, लिंबू सरबत बरोबर ठेवतो आणि प्रवासादरम्यान याचे सेवन करतो. तर आज सोशल मीडियावर उबर कंपनीच्या ड्रायव्हरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या ड्रायव्हरने अगदीच खास पद्धतीत त्याची गाडी सजवून घेतली आहे आणि प्रवासादरम्यान प्रवाशांची काळजी घेण्यासाठी काही उपयोगी वस्तूंची सोय करून ठेवली आहे.

व्हायरल व्हिडीओ नोएडामधील आहे. एक तरुणी प्रवास करण्यासाठी कॅब बुक करते. कॅब बुक केल्यावर जेव्हा ती या गाडीत बसते तेव्हा तिला आश्चर्य वाटते. कारण, या कॅबमध्ये ड्रायव्हरच्या सीटच्या मागे अनेक कप्पे तयार करून ठेवलेले तिला दिसतात. या सर्व कप्प्यांमध्ये मास्क, तेल, सनस्क्रीन, छोटा फॅन, वर्तमानपत्र, टिशू ते अगदी कचराकुंडीपर्यंत अनेक उपयोगी वस्तूंनी ही गाडी सजवण्यात आली आहे. कॅब ड्रायव्हरने कशाप्रकारे उपयोगी वस्तूंनी त्याची गाडी सजवली आहे, एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.

हेही वाचा…Video: पाण्याखाली जादू दाखवत केला विश्वविक्रम! १३ वर्षांच्या मुलीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद…

व्हिडीओ नक्की बघा :

टॉफी, आलू भुजिया, कॉफी, पाणी आणि फ्रुटी सरबतच्या प्लास्टिकच्या बाटलीसुद्धा आहेत. तसेच गाडीत अनेक संदेशसुद्धा हिंदी भाषेत कागदावर लिहिलेले आहेत. तर या सर्व खास वस्तूंनी सजवलेली गाडी पाहून तरुणी अगदीच खुश झाली आणि तिने याचा व्हिडीओ शूट करून घेतला आणि सोशल मीडियावर शेअर केला व कॅप्शनमध्ये लिहिले की, मी नोएडामध्ये एक कॅब बुक केली आणि ही कॅब बघून मी प्रभावित झाले. ड्रायव्हरला सलाम! कारण, त्याने प्रवास करताना लागणाऱ्या जवळपास सर्व आवश्यक गोष्टी या गाडीत ठेवल्या आहेत. ज्यात हेअर बँड, टॉफी, पाणी, फ्रुटी, नॅपकिन्स, छत्री यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @radha_pundir या युजरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या युजरचे नाव राधा असे आहे आणि ती सोशल मीडियाची ब्लॉगर आहे. तसेच ही अनोखी कॅब अब्दुल कादीर या व्यक्तीची असून तो एक उबर ड्रायव्हर आहे, तर राधा या सोशल मीडिया ब्लॉगरने व्यक्तीचे नाव लिहून त्याचा नंबरही व्हिडीओच्या कमेंटमध्ये नमूद केला आहे. तसेच तरुणीने तिचा प्रवासादरम्यानचा कॅबमधील अनुभव व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये शेअर केला आहे.