समोसा हे अनेकांचे आवडत्या स्नॅक्सपैकी एक आहे. पार्टी असो किंवा घरातील कोणतेही गेट टुगेदर समोसा सगळीकडे उपस्थित असतोच. सध्या मेरठमधील एक समोसा चर्चेचा विषय ठरत आहे. याचे कारण म्हणजे हा समोसा चक्क ८ किलोचा आहे. मेरठमधील ‘कौशल स्वीट्स’ या दुकानात या भव्य समोसा बनवण्यात आला आहे. या समोस्याचा आकार पाहून नेटकरी आवाक झाले असून, याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या भव्य समोस्याचा व्हिडीओ उद्योगपती हर्ष गोएंका यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओला हटके कॅप्शन दिले आहे. त्यांनी लिहले आहे, ‘दिवाळीत खूप मिठाई खाल्ल्यामुळे माझ्या पत्नीने मला एकापेक्षा जास्त समोसा खाऊ नका असे सांगितले आहे.’ या कॅप्शनवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा : मंत्र्याचा दिलदारपणा; शेकडो गरीब मुलांना घडवली मॉलची सैर, दिली हवं ते खरेदी करण्याची मुभा

हर्ष गोएंका यांनी शेअर केलेला व्हिडीओ :

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहा.

आणखी वाचा : स्वतः स्टूल सारत कुत्र्याच्या पिल्लाने केली आजींची मदत; गोंडस Viral Video एकदा पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हर्ष गोएंका यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा भव्य समोसा पाहून नेटकऱ्यांनी लगेचच समोसा खायची इच्छा झाल्याचे कमेंट्समध्ये लिहले आहे.