भारतीय लोक कधीही विसरू शकत नाहीत अशी गोष्ट, अशी जखम म्हणजे भारत आणि पाकिस्तानची फाळणी. देशाचे दोन तुकडे होणे ही बाब तर होतीच, पण याबरोबरच जनतेमधेही फूट पडणे ही खूप मोठी गोष्ट होती. १९४७ च्या फाळणीमुळे जनतेला झालेल्या जखमा अजूनही आहेत. फाळणीमुळे किती माणसे एकमेकांपासून विभक्त झाली हे कळलेसुद्धा नाही. कुणाचा परिवार, कुणाचा मित्र तर कुणाचा मित्र त्याच्यापासून कायमचा विभक्त झाला.

७४ वर्षांनंतरच्या भेटीला व्हिडीओ व्हायरल

असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ करतारपूर गुरुद्वारा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये दोन भाऊ मिठी मारून रडताना दिसत आहेत. भारत-पाकिस्तानच्या फाळणीदरम्यान हे दोघे भाऊ वेगळे झाले होते आणि आता ७४ वर्षांनंतर दोघेही पहिल्यांदाच भेटू शकले आहेत. अशा प्रसंगी कंवल जियान म्हणतात-“आमचे रक्ताचे नाते सीमांचे नाही, आमच्या गंगा सुद्धा आहे चनाब सुद्धा आहे.”

(हे ही वाचा: सहा सिंहीणीसोबत जंगलात बिनधास्तपणे फिरत होती ही मुलगी, धक्कादायक व्हिडीओ होतोय Viral)

व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे, या दोन भावांचे हे मिलन पाहून काही लोक भावूक होत आहेत, तर काहीजण या विभाजनाला वाईट बोलत आहेत.

(हे ही वाचा: समुद्रात पोहताना पाठून आला व्हेल मासा आणि…; बघा Viral Video)

(हे ही वाचा: रेल्वे रुळावर बाईक चालवत होता तरुण, समोरून आली ट्रेन आणि…; बघा Viral Video)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाहेरची परिस्थिती काहीही असो, अनेक दशकांनंतर दोन भाऊ पुन्हा एकदा भेटले आहेत.