पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमामध्ये झळकणार आहेत. कार्यक्रमाचा सुत्रसंचालक बेअर ग्रिल्सनेच यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. बेअर ग्रिल्सने ट्विटवरुन एक टिझर पोस्ट केला आहे. जगभरातील १८० देशांच्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची या आधी कधीही न पाहिलेली बाजू पहायला मिळेल असं या ट्विटमध्ये बेअरने म्हटलं आहे.

बेअरने केलेल्या या घोषणेनंतर ट्विटरपासून फेसबुकपर्यंत त्याच्याच नावाची चर्चा आहे. ट्विटरवर या कार्यक्रमासंदर्भातील #PMModionDiscovery हा हॅशटॅग पहिल्या क्रमांकावर तर Bear Grylls हा टॉपिक चौथ्या क्रमांकावर ट्रेण्ड होत आहे. हेच हॅशटॅग वापरून अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, बेअर ग्रिल्स, डिस्कव्हरी, मोदींचे विरोधक अशा सर्वांनाचा ट्रोल केले आहे. या टिझरमधील अनेक स्क्रीनशॉर्टसचे काही तासांमध्ये मिम्समध्ये रुपांतर झाले आहे. पाहूयात असेच काही व्हायरल झालेले मिम्स.

१)
ना खाऊंगा…

२)
डिस्कव्हरीची पहिली प्रतिक्रिया

३)
असा कोणता जोक असतो की…

४)
हे सारखचं वाटतयं

५)
१३ ऑगस्टला बेअर ग्रिल्स

६)
पंतप्रधान आहेत, करु सहन बाकी काय करणार…

७)
याकडे कोण कसं बघतयं

८)
मी त्या मित्राला कसा वागवतो

९)
हे कोणाचं…

१०)
विरोधकांना बेअर कसा दिसत असेल

११)
पिकनीला पोरं कशी वागतात

१२)
दोघेही शाळेत जात नाही तेव्हा

१३)
हे काहीच नाही

१४)
बुमराहला भारतीय चाहते

१५)
राहुल गांधींनी विचारल्यावर

१६)
कोणाचं काय तर कोणाचं काय

१७)
..म्हणून मी जीममध्ये राहतो

१८)
जेवणासाठी तुम्ही पैसे देता

१९)
वा…

२०)
थोडं ब्रॅण्डींग

दरम्यान, बेअरने केलेल्या ट्विटमध्ये त्याने, ‘प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि वातावरणातील बदलाकडे लक्ष्य वेधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतामधील जंगलांमधून फिरताना दिसतील’ असं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सहभाग असणारा ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’चा हा विशेष भाग डिस्कव्हरी इंडियावर ऑगस्ट १२ रोजी रात्री नऊ वाजता प्रदर्शित होणार आहे.