दिल्ली मेट्रोतील कधी धक्कादायक तर कधी मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. शिवाय अनेक तरुण रील करण्यासाठी आणि सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी दिल्ली मेट्रोचा गैरवापर करत असल्याची अनेक उदाहरण आपण या आधी पाहिली आहेत. नुकतेच एका तरुणीने चक्क बिकिनी घालून दिल्ली मेट्रोतून प्रवास केल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. हा व्हिडीओ पाहून अनेक प्रवाशांना उर्फी जावेदची आठवण आली होती, तर अनेकांनी या मुलीच्या कपड्यांवर तीव्र संतापही व्यक्त केला होता.

बिकिनी घालून प्रवास करणाऱ्या तरुणीची चर्चा अजून संपली नाही तोच आता मेट्रोतील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक जोडपे सर्व प्रवाशांसमोर कीस करताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा मेट्रोतील प्रवाशांनी संताप व्यक्त करत अशा जोडप्यांना आवरा अशी मागणी मेट्रो प्रशासनाकडे केली आहे. सध्या एका जोडप्याचा मेट्रोतील व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते एकमेकांना किस करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ दिल्ली मेट्रोतील असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओमधील जोडप्याचे कृत्य पाहून अनेक प्रवाशांनी आपली मान लाजेने खाली घातल्याचंही दिसत आहे.

हेही पाहा- भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात स्कुटीवरील महिला थेट हवेत; थरारक CCTV फुटेज Viral

सध्या अनेक तरुण सार्वजनिक ठिकाणी अयोग्य कामे करताना दिसत आहेत. अशाच काही तरुणांनी मेट्रोला रील करण्याचा अड्डाच बनवला आहे. मेट्रोतील असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये काही तरुण कसाही डान्स करताना तर कधी टॉवेलवर मेट्रोतून प्रवास करताना दिसतात. अशातच आता पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोतील एका व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. ज्यामध्ये एक कपल सर्वांसमोर रोमान्स करताना दिसत आहे. चालत्या मेट्रोमध्ये रोमान्स करत असलेले हे जोडपे एकमेकांचा किस करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही पाहा- ट्रेनमध्ये विंडो सीटसाठी तरुणाने भन्नाट डोकं लावलं; Video मध्ये जुगाड पाहून तुम्ही म्हणाल, “मुंबई लोकलमध्ये…”

नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप –

मेट्रोमध्ये रोमान्स करणाऱ्या जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओमध्ये हे जोडपे सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करत असल्याचे दिसत आहे. शिवाय अशा लोकांच्या अशा कृत्यांमुळे इतर प्रवाशांनाची गैरसोय होत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. दरम्यान, हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी असं अश्लील कृत्य करणाऱ्या जोडप्यावर कडक कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.