MHT CET Result 2022 for PCM and PCB Updates: महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचा आज (१५ सप्टेंबर) ला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) या विषयांसाठीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. संध्याकाळी पाच वाजल्यापासून cetcell.mahacet.org. या अधिकृत साईटवर मार्कशीट डाउनलोड करता येतील.

यावर्षी, पीसीएम गटासाठी महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा ५ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आली होती आणि पीसीबी गट परीक्षा १२ ऑगस्ट ते २० ऑगस्टपर्यंत आयोजित करण्यात आली होती. परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) म्हणून ऑनलाइन मोडद्वारे घेण्यात आल्या. CUET UG परीक्षेप्रमाणे, या वर्षी पीसीएम आणि पीसीबी गटांसाठी २८ ऑगस्ट २०२२ रोजी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्र द्वारे पुनर्परीक्षा घेण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा निकाल कसा पाहाल?

  • उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट — cetcell.mahacet.org — सुरु करावी
  • मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या स्कोअर कार्ड लिंकवर क्लिक करा
  • उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख विचारला जाईल
  • यशस्वीरित्या लॉग इन केल्यानंतर, स्कोअर कार्ड स्क्रीनवर दिसेल.

दरम्यान, काही परीक्षा केंद्रांवर तांत्रिक त्रुटींमुळे किंवा पाऊस आणि पुरामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नव्हते म्हणून पुनर्परीक्षा आयोजित करण्यात आली होती. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे या विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षा घेतली होती आणि उमेदवारांना सांगण्यात आले की, जर त्यांनी पुनर्परीक्षेसाठी नोंदणी केली, तर दुसऱ्यांदा मिळालेल्या गुणांना गृहीत धरण्यात येणार आहे.