Shocking video: सोशल मीडियावर रोज अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात, काही व्हिडीओ पाहून हसू येत तर काही व्हिडीओ पाहून धक्का बसतो. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तुम्हीही जर घरच्या घरी घर घंटीवर पिठ दळत असाल तर हा व्हिडीओ पाहून तुम्हीही घर घंटीवर पीठ दळताना शंभर वेळा विचार कराल. आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या घरगुती पिठाच्या गिरण्या उपलब्ध आहेत. काही गिरण्या लहान आणि हाताने चालवल्या जातात, तर काही मोठ्या आणि विजेवर चालणाऱ्या असतात.
पूर्वीच्या काळी, जेव्हा वीज नव्हती, तेव्हा स्त्रिया जात्यावर धान्य दळून पीठ करत असत. हे पीठ चपाती, भाकरी किंवा इतर पदार्थांसाठी वापरले जायचे. आजही काही ठिकाणी, विशेषतः ग्रामीण भागात, जात्याचा वापर केला जातो. एकेकाळी जातं ही ग्रामीण जीवनाची खरी ओळख होती. ग्रामीण जीवनाची पहाट या जात्यानेच सुरू व्हायची. प्रत्येक घरी जातं असायचं आणि या जात्याची घरघर पहाटेच सुरू व्हायची. त्यामुळे पहाटे आपोआपच सारं गाव जागं व्हायचं.पूर्वीच्या काळी गिरणी नव्हत्या. त्यामुळे घरबसल्याच पीठ मिळत असे. जात्यावर बसून पीठ दळलं जाई. जाड, बारीक पाहिजे तसं पीक त्या त्या बायका दळत असत. मग ते तांदळाचं पीठ असो वा जोंधळे. पूर्वीच्या काळी पहाटे दळण दळायचं कारण म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं पीठ दळलं की त्याच्या भाकर्या, चपात्या काय असेल ते भाजल्या की झालं. ताजं पीठ, ताज्या पीठाच्या भाकर्याही मिळत असत घरच्या लोकांना. त्यानंतर आल्या गिरण्या आणि आता थेट घरीच घर घंटी आली. माणसानं एवढी प्रगती केली मात्र याचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत.
आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की असं झालं तरी काय? तर झालं असं की एक महिला घर घंटीवर पीठ दळताना घर घंटीचा अचानक स्फोट झाला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शआटा चक्की जास्त वेळ चालू ठेवल्यामुळे ते हिट होऊन असे आतील सर्व जळून जातेकता, चक्की जास्त वेळ चालू ठेवल्यामुळे ती प्रचंड गरम झाली आणि हिट होऊन त्याचा स्फोट झाला. त्यामुळे महिलांनो घर घंटीवर पीठ दळताना सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ dhyas_sheti नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. एकानं म्हंटलंय, “परत पहिल्या सारखं जात्यावर दळायला पाहिजे.” तर आणखी एकानं, “शक्यतो बाजरी सारखे धान्य वाळवून दळत जा सादळ जास्त असतो त्यामुळे आतमध्ये चाळणी लाॅक होऊन पात्याचे अतिरिक्त घर्शण होऊ असा प्रकार होता.”