Louis Vuitton Bag Viral Video: विविध सामान तयार करणाऱ्या कंपन्या आपल्या आकर्षक डिझाईन्सने ग्राहकांचे मन जिंकत असतात. लुई व्हिटॉन (Louis Vuitton​ ) कंपनीचे नाव देखील अशा यादीमध्ये समाविष्ट होते. सेलेब्सला या कंपनीच्या बॅगचे डिझाइन्स इतक्या आवडतात की, या ब्रँडच्या बॅग शिवाय त्यांचा लूक सुद्धा पूर्ण होत नाही असे मानतात. पण या ब्रँडच्या एका बॅगेचे किंमत लाखोंमध्ये असते. प्रत्येक प्रॉडक्टवर लोगो असतो, जो या बॅगला इतरांपेक्षा खूप वेगळी बनवतो. ही कंपनी सुंदर हँडबॅग्स बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच आता डिझायनर्सने असे काही केले आहे की ज्याबाबत ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

मीठाच्या दाण्यापेक्षा छोटी बॅग

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या हँडबॅगचे छायाचित्र MACHF (@mschf) नावाच्या अकाऊंटद्वारे पोस्ट केले गेले. एकून ३ फोटो समोल आले आहेत. बॅगची रचना मायक्रोस्कोपिक दृश्‍यातून दाखविल्याचे पहिल्या फोटोमध्ये दिसते. यामध्ये हिरव्या रंगाची बॅग दिसत आहे, ज्यावर लुई व्हिटॉनचा लोगो आहे. दुसऱ्या फोटोत बोटावर पिशवी ठेवल्याचे दिसत आहे. त्याच वेळी, तिसऱ्या फोटोमध्ये त्याचा मोठा आकार दिसत आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही बॅग MSCHF ने डिझाईन केली आहे, जी व्हायरल मार्केटिंग आर्टमध्ये तरबेज आहे. विशेष बाब म्हणजे पॅरिस फॅशन वीकमध्ये या बॅगला लिलावासाठी ठेवण्यात येणार आहे. ते मिठाच्या दाण्यापेक्षा लहान असते. तसेच ते सुईच्या बिळातून आरपार जाऊ शकते. एवढेच नाही तर बॅग पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्राची गरज आहे. या बॅगेच किंमच ५२ लाख असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा – दोन गायी अन् एक डोकं? फोटो पाहून गोंधळून जाल; सांगा पाहू, कोणत्या गायीचं आहे हे डोकं?

बॅग पाहून लोकांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया

एका दिवसापूर्वी शेअर केलेल्या या पोस्टला ७० लाखांहून अधिकांनी पसंती दर्शवली आहे.. यासोबतच यूजर्स त्यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. एकाने लिहिले – याची शिपिंग कशी केली जाईल? दुसरा व्यक्ती म्हणतो की, कल्पना करा जर ही बॅग कुठेतरी पडली तक तर. या बॅगमध्ये तुम्हाला काय आकर्षक वाटले? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून कळवा.

हेही वाचा – तुम्ही ५ सेंकदात फोटोमधील मांजर शोधू शकता का? 99 टक्के लोकांना सापडले नाही उत्तर….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॅग्स जाळून टाकते ही कंपनी

लूई वीटॉनच्या बॅग्जची कॉपी कोणीही तयार करू शकत नाही. कारण कंपनी उरलेला स्टॉक संपवण्यासाठी बॅग्स जाळून टाकते. जेणे करून ते एक्सक्लूसिव्ह राहील आणि त्यांची किंमतीमध्ये घट होईल. याशिवाय ब्रँडमध्ये दुसऱ्या कोणत्या ब्रँडपेक्षा वेगळी दिसण्याचा निर्णय घेतला जातो. कदाचित हेच कारण आहे की बॅग्ज तयार करणाऱ्या कंपनीच्या यादीमध्ये लूई व्हिटॉन एक प्रसिद्ध आणि मोठा ब्रँड आहे.