Harley Davidson bike viral video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा अंदाज कुणालाही लावता येणार नाही. रस्त्यावरून येजा करताना कुणीतरी भन्नाट कल्पना डोक्यात घेऊन फिरतो आणि त्याचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतो. एरव्ही गावात किंवा शहरात फिरणारा दुधवाला सायकल किंवा दुचाकीवर प्रवास करताना दिसतो. पण एका दुधवाल्याने कमालच केलीय. कारण हा दुधवाला चक्क हार्ले डेव्हिडसन स्पोर्ट्स बाईकवर दुधाच्या किटल्या बांधून दुध व्रिक्रिचा व्यवसाय करतो. या दुधवाल्याचा भन्नाट व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असल्याने दुधवाला रातोरात प्रकाशझोतात आलाय. साध्या बाईकवर दुधाच्या किटल्या बांधून दुध विक्रिचा व्यवसाय करताना आपण अनेक दुधवाल्यांना पाहिलं असेल. पण आता त्याचा अपडेटेड व्हर्जन आल्याचा या व्हिडीओच्या माध्यामातून पाहायला मिळाला आहे.

तुम्ही कधी हार्ले डेव्हिडसन दुधवाल्याला पाहिलंय का?

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओनं नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामागे कारणंही तितकच भन्नाट आहे. कारण सायकलवरून दुधाच्या किटल्या घेऊन जाणं आता कालबाह्य झालं असलं, तरी आताचा काळ थेट हार्ले डेव्हिडसन सारख्या लाखो रुपयांच्या बाईकवर येऊन ठेपेल, याचा कुणी विचारही केला नसेल. स्पोर्ट्स बाईकची आवड असणारे रस्त्यावर स्टंटबाजी करताना दिसतात. पण स्पोर्ट्स बाईकवर किटल्या बांधून पैसे कमावण्याची भन्नाट कल्पना या दुधवाल्याच्या डोक्यात आली आणि सोशल मीडियावर दुधवाल्याचीच चर्चा रंगली. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.

नक्की वाचा – Video: सुसाट स्पोर्ट्स बाईक चालवणाऱ्या तरुणीने हायवेवर तरुणाला दिली धडक, रायडिंगचा थरार होतोय व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला. हार्ले डेव्हिडसनच्या या बाईकच्या पाठीमागे गुर्जर लिहिलं आहे. amit_bhadana_3000 नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १ लाख ९१ हजारहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तर लाखोंच्या संख्येत या व्हिडीओता व्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी या व्हिडीओला प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं, जेव्हा एका पित्यानं फॅमिली बिजनेला जोडण्यासाठी हार्ले डेव्हिडसन देण्याचा विचार केलाय, असंच काही पाहायला मिळत आहे.”