“हे तर अति झालं”, मॅगीच मिल्कशेक पाहिल्यावर नेटीझन्सनी केला राग व्यक्त

पण कल्पना करा की जर आपल्या आवडत्या मॅगीला मिल्कशेकच्या ग्लासमध्ये सर्व्ह केलं तर तुम्हाला कसे वाटेल?

maggie milkshake
हे फोटो व्हायरल झाले आहेत (फोटो:Twitter)

रात्रीची भूक असो किंवा आळस झटपट तयार होणारी मॅगी कोणाला आवडत नाही. मॅगी ही सगळ्याच वयोगटातील लोकांना आवडते यात शंका नाही. वर्षानुवर्षे, डाळी, तांदूळ आणि पीठासह इतर खाद्यपदार्थांप्रमाणे मॅगी हाही स्वयंपाकघरातील एक भाग आहे. दिवसाच्या कोणत्याही वेळी, नेहमी पोटाच्या आरामाच्या शोधात मॅगीकडे वळले जाते.काहींना मॅगी सूपसह आवडते, तर काही लोकांना बर्‍याच भाज्या, चीज आणि इतर टॉपिंग्जसह खायला आवडते. मॅगी खाण्याची प्रत्येकाची स्वतःची पद्धत आहे. पण कल्पना करा की जर ही मनमोहक आणि मनस्वी मॅगी मिल्कशेक मिसळलेल्या ग्लासमध्ये सर्व्ह केली तर तुम्हाला कसे वाटेल?

‘मिल्कशेक वाली मॅगी’ म्हणत असा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये, मिल्कशेक ग्लासच्या वर मॅगी नूडल्स दिसत आहेत. हा फोटो रेस्टॉरंटचे असावा असं म्हणत असले तरी त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडीयावर सुद्धा युजर्स या मिल्कशेकसह मॅगीच्या फोटोवर सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. बहुतेक वापरकर्त्यांना त्यांच्या मॅगीने केलेला हा प्रयोग आवडला नाही.

सोशल मीडिया वापरकर्त्यांची प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसात आपण मॅगीच्या प्रयोगाची अनेक फोटो व्हायरल होताना पाहिली आहेत. जूनमध्येही ओरेओ आणि चॉकलेट सिरपसह मॅगीचे फोटो व्हायरल झाले होते तथापि, यावेळी सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया दर्शवतात की त्यांना या मिल्कशेकसह मॅगीचा प्रयोग अजिबात आवडला नाही.

दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, “मी हे पाहण्यापासून स्वतःला कसे वाचवू शकतो.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Milkshake maggie photos viral on social media netizens doesnt like this experiment ttg

ताज्या बातम्या