महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात काल दादरमध्ये शिवसेना भवन परिसरामध्ये बॅनरबाजी करण्यात आल्यानंतर आता मनसेने या बॅनरबाजीला उत्तर दिलं आहे. डोंबिवलीमधील मनसेच्या कार्यकर्त्यांकडून ज्या पद्धतीने दादरमध्ये राज ठाकरेंचा काल आज आणि उद्या पद्धतीने फोटो असणारा बॅनर झळकावत टीका केली होती तशीच टीका करणारा फोटो व्हायरल केला जातोय.

राज ठाकरे यांचा मुस्लिमांप्रमाणे गोल टोपी घातलेला फोटो काल, आज हनुमान आणि उद्या काय अशापद्धतीचा टोला लगावणारे बॅनर्स काल दादरमध्ये झळकावण्यात आलेले. या बॅनर्सला उत्तर देण्यासाठी आता मनसेच्या डोंबिवलमधील काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काल,आज आणि उद्या? असे फोटो व्हायरल केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मशीदीवरील भोंग्यांबाबात आक्षेप घेतला होता.

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
46 lakhs in the bungalow and house of the corrupt Tehsildar
नोटांचे ढीग पाहून एसीबी अधिकारीही चक्रावले; लाचखोर तहसीलदाराच्या बंगला व घरात ४६ लाखाचे घबाड, कॅश मोजायला…
Sanjay Singh
नितीश कुमारांचे बाहेर पडणे ‘इंडिया’ आघाडीसाठी मोठा धक्का? ‘आप’चे संजय सिंह म्हणाले…
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

नक्की वाचा >> “बाळासाहेब, आपले सुपुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदू असून…”; मनसेची शिवसेना भवनासमोरच बॅनरबाजी

भोंगे न उतरवल्यास मशीदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं. यावरुन महाविकास आघाडी सरकामदील नेत्यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. आता पुन्हा राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका करणारे बॅनर्स शिवसेना भवन परिसरात लागले आहेत. यात राज ठाकरेंचा एक फोटो आहे, ज्यात त्यांनी मुस्लिम धर्मीयांची टोपी प्रधान केली आहे. दुसऱ्या फोटोत हनुमान असं लिहीण्यात आलंय, तर तिसऱ्या फोटोत प्रश्नचिन्ह दाखवण्यात आले आहे.

आता यालाच मनसेने उत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो शेअर केले आहेत. यात काल उद्धव ठाकरे हे बाळासाहेब यांच्यासोबत होते. तर आज उद्धव ठाकरे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सोबत आहेत आणि उद्या कोणासोबत अशा आशयाचा सवाल उपस्थित करत फोटो व्हायरल केला जातोय.

त्याचप्रमाणे अन्य एका फोटोमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी हे हात उंचावून दाखवताना दिसत आहेत. त्यानंतरच्या फोटोत उद्धव ठाकरे सोनिया गांधींसोबत दिसत आहेत. हा फोटो आज या मथळ्याखाली वापरण्यात आलाय. तर पुढल्या फोटोमध्ये ‘उद्याची शक्यता’ मथळ्याखाली आदित्य ठाकरे हे एमआयएमच्या नेत्यांसोबत चालताना दाखवण्यात आलेत.

शिवसेना भवनासमोर काल जो निनावी बॅनर लावण्यात आला त्यामध्ये राज ठाकरेंचा जो फोटो वापरुन आम्हाला डिवचण्याचं काम शिवसेनेनं केलंय. त्यासाठीच मी असा फोटो व्हायरल केलाय की पूर्वी जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती ती, आज राष्ट्रवादीसोबत असणारी शिवसेना आणि भविष्यात कोणाबरोबर जातील सांगता येत नाही असं दाखवण्यात आलंय. यामधून भूमिका बदललीय कोणी हे दाखवून देण्याचा उद्देश आहे, असं मनसेचा कार्यकर्ता असणाऱ्या गणेश कदम याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय. या फोटोंच्या माध्यमातून मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेला डीचवले आहे.