Snake Fight Mongoose Viral Video : साप आणि मुंगूस यांच्यात मोठं वैर आहे. जेव्हा हे दोन शत्रू एकमेकांसमोर येतात तेव्हा एकाचा तरी मृत्यू निश्चित असतो. त्यांच्या लढाईत एक जीव वाचवण्यासाठी तर दुसरा जीव घेण्यासाठी लढत असतो. सापाला भले भले प्राणी घाबरत असले तरी मुंगूसासमोर त्याचं काहीच चालत नाही, कारण मुंगूस धारधार दातांनी सापाला गंभीर जखमी करतो, तो सापापेक्षा चपळ असतो. जो सहसा उड्या मारून सापाच्या हल्ल्याचा प्रतिकार करू शकतो. त्यामुळे मुंगूस मृत्यूची पर्वा न करता सापाशी भिडतो. सध्या सोशल मीडियावर साप आणि मुंगुसाच्या लढाईचा असाच एक थरारक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात मुंगूस सापाचा फणा जबड्यात पकडून पुढे असं काही करतो की पाहून तुम्हाला धडकी भरेल.
व्हिडीओत भररस्त्यात एक विषारी साप आणि मुंगूस एकमेकांशी लढताना दिसतायत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका गाईसमोर दोघांची लढाई सुरू आहे. पण, गाय फक्त उभी राहून तमाशा पाहतेय. पण, मुंगूस काय किंवा साप कोणीही मागे हटण्यास तयार नाही.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, साप रस्त्याच्या कडेने फणा वर करत सरपटत जात असतो. त्याच्या मागोमाग मुंगूसही जाऊ लागतो. साप फण्याच्या मदतीने मुंगूसाला घाबरवण्याचा प्रयत्न करतो, पण मुंगूस मागे न हटता संधी मिळेल तसा सापावर झडप घालण्याचा प्रयत्न करतो. चवताळलेला मुंगूस सापाच्या भोवती गोल गोल फिरतो आणि शेवटी सापाच्या फण्यावर हल्ला करतो. मुंगूस सापाचा फणा तोंडात पकडून झटकतो आणि त्याला गंभीररित्या जखमी करतो.
मुंगूस सापाचा फणा जबड्यात पकडून फरफटत नेतो अन्…
साप त्याच्या जबड्यातून सुटण्याचा खूप प्रयत्न करतो, पण काही केल्या सुटका होत नाही. अखेर कशीबशी सुटका करून तो पळण्याचा प्रयत्न करतो, पण मुंगूस पुन्हा त्याच्या मागे पळत जाऊन फण्यावर हल्ला करतो. ही लढाई खूप वेळ सुरू राहते. शेवटी मुंगूस सापाचा फणा जबड्यात पकडून फरफटत घेऊन जातो, तरीही साप सुटतो. यानंतर जिंकणारा मुंगूस अचानक कुठेतरी निघून जातो.
मुंगूस आणि सापाच्या लढाईचा हा व्हिडीओ @ritesh_kumar_नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर युजर्सनेही वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी लढाई पाहिली आहे. तर दुसऱ्याने लिहिले की, ही लढाई अशी संपेल याची कोणीही कल्पनाही केली नसेल, तिसऱ्या एकाने लिहिले की, जर कोणी या लढाईचा पुरेपूर आनंद घेतला असेल तर ती गाय होती.