Viral video: सोशल मीडियावर हल्ली प्राण्यांचे व्हिडीओ फार वेगाने लोकप्रिय होतात. प्राण्यांच्या बऱ्याचशा हालचाली कॅमेऱ्यात टिपल्या जात आहेत. त्यांचे व्हिडीओ इतके मजेशीर आणि मनोरंजन करणारे असतात की काही क्षणांतच ते अनेक लोकांपर्यंत पोहोचतात.स्मार्टफोन असणं ही आज काळाची गरज झाली आहे. पण या फोनचा गैरवापर देखील कमालीचा वाढला आहे. अनेकदा गरज नसतानाही, खाताना-पिताना,खरेदी करताना अगदी रस्ता ओलांडताना देखील आपण आपला फोन न्याहाळत असतो. लक्षवेधी बाब म्हणजे आपण कितीही दमलो असलो तरी फोन न्याहाळायला काही विसरत नाही. अन् आता माणसांची हीच सवय प्राण्यांमध्येही उतरु लागली की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. होय, हा व्हिडीओ पाहून कदाचित तुम्हाला धक्काच बसेल. एका माकडाने एका व्यक्तीकडून त्याचा दीड लाख रुपयांचा आयफोन हिसकावून घेतला आणि एका अडचणीच्या ठिकाणावर जाऊन बसला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे माकड एका दरीत असणाऱ्या झाडावर बसलं आहे. मोबाईल हिसकावून पळ काढलेलं माकड जिथे बसलं आहे तिथे खाली खोल दरी आहे, त्यामुळे माकडाच्या थोड्याशा चूकीनं तो मोबाईल खाली पडू शकतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही मालकाची दया येईल एवढं नक्की. पुढे त्या माकडानं मोबाईल दिला की पळ काढला याची माहिती मिळू शकलेली नाही.

हा व्हिडीओ खूप मजेशीर असून तो पाहिल्यानंतर अनेकजण त्यावर विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. माकडाचा हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. त्यामुळे आजकाल माकडदेखील योग्य डिल करत असल्याचं काही नेटकरी म्हणत आहेत.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ patal_tar_ghyaa नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने व्हिडिओवर खिल्ली उडवली, “माकड पक्का हुशार आहे.” तर दुसरा म्हणाला, “माकडाला वस्तु विनिमय प्रणाली माहित आहे.”