Monkey Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे खूप हसवतात तर काही व्हिडीओंमधील प्राण्यांचे कारनामे पाहून चकित व्हायला होते. असे व्हिडीओ लोकांपर्यंत पोहोचताच खूप व्हायरल होतात. यात एका माकडाचा मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक माकड एका माणसाबरोबर असं काही वागला की पाहून तो माणूस विचारात पडला, पण व्हिडीओ पाहून तुम्हाला मात्र पोट धरून हसायला येईल.

व्हिडीओमध्ये एक माकड कचऱ्याच्या डब्यावर बसून आरामात लस्सी पित होते. यावेळी लस्सी पिण्याच्या नादात तो त्याचे आवडते फळ केळं चक्क कचऱ्याच्या डब्यात फेकून देतो, हे पाहून तो माणूसदेखील विचारात पडतो.

माकड ग्लासमध्ये उरलेली लस्सी चक्क बोटाने काढून चाखतोय

व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक माकड कचऱ्याच्या डब्यावर आनंदाने बसलेले दिसत आहे. त्याच्या हातात लस्सीचा एक ग्लास आहे, तो पाहून असे वाटते की कोणीतरी त्याला ती प्यायला दिली असावी किंवा कचऱ्यात फेकून दिलेली त्याने उचलली असावी. ते माकड ग्लासमधून उरलेली लस्सी काढून पीत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माकड ग्लासमध्ये उरलेली लस्सी चक्क बोटाने काढून चाखत आहे. यादरम्यान एक माणूस त्याच्याजवळ जातो आणि त्याला हातात केळं देतो. यावेळी माकड त्याच्याकडे फारसे लक्ष देत नाही. पण, जेव्हा तो माणूस जास्त आग्रह करतो तेव्हा तो केळं घेतो आणि थेट कचऱ्याच्या डब्यात फेकून देतो आणि आरामात बसून पुन्हा लस्सी चाखतो.

माकडाचा हा मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @Jhantu_jetha नावाच्या अकाउंटने शेअर करण्यात आला आहे, जो आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आणि त्यावर कमेंट केली आहे. एका युजरने लिहिले की, ‘मी पहिल्यांदाच माकडाला असे करताना पाहिले आहे.’ तर दुसऱ्याने लिहिले की, ‘लस्सीची चव बिघडू नये म्हणून त्याने केळं फेकून दिले असावे.’