Monkey video viral: अलिकडे सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक मजेदार व्हिडीओ शेअर केले जातात. आता व्हायरल झालेला हा व्हिडीओच बघा. माकड स्वभावाने खूप खेळकर असतं, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याला एका जागी स्थिर बसणं आवडत नाही, यासोबतच एखाद्याची नक्कल करण्यात माकड सर्वात पुढे असतं. माकड हा प्राणी प्रेक्षणीय स्थळांवर सर्रास दिसतो. कारण पर्यटकांकडे खाण्याचे पदार्थ असतात. अन् हे पदार्थ मिळवण्यासाठी माकडं मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. पण माकडांच्या फार जवळ जाऊ नका, त्यांना खायला देऊ नका असा सुचना वारंवार दिल्या जातात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर सध्या दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही गंभीर असतात तर काही मजेशीर असतात. एका माकडाचा सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ हा भलताच मजेशीर आहे.
माकडं पर्यटकांच्या बॅगा हिसकावून घेणे असो किंवा नाश्त्याची चोरी करणे असो, माकडे यामध्ये नेहमी पुढे असतात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अशाच एका घटनेत, एका माकडाने एका महिलेची पर्स हिसकावून घेतली आणि आत ठेवलेल्या वस्तू बाहेर काढल्या. व्हिडिओमध्ये, माकड हातात पर्स घेऊन सगळीकडे फिरताना दिसतो. एक एक करून माकड पर्समधून वस्तू काढत आहे, कदाचित अन्नाच्या शोधात. तो बॅगेत ठेवलेल्या सर्व गोष्टी बाहेर काढतो, ओले टिश्यूज, टोपी, मेकअप पाउच आणि काही कपडे यापासून सुरुवात करतो. शेवटी, जेव्हा त्याला खायला काही मिळत नाही, तेव्हा तो माकड मिनी मेकअप बॅगची झिप उघडतो, दुसरे मिनी वॉलेट काढतो आणि पळून जातो.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडिओ @travelwithbrahmi, जो इन्स्टाग्रामवर ट्रॅव्हल आणि लाइफस्टाइल इन्फ्लुएंसर आहे, ब्राह्मी कापसी यांनी पोस्ट केला होता. या व्हिडिओला नेटिझन्सकडून मजेदार प्रतिक्रिया मिळाल्या आहेत आणि तो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. त्याला सुमारे १.६ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत आणि १२ हजार+ लाईक्स मिळाले आहेत.व्हिडिओवर खूप विनोदी कमेंट्स आहेत. एका युजरने लिहिले, ” जणू काही माकड बॅगेत त्याच्या एक्सला शोधत आहे.दुसऱ्या युजरने लिहिले, तो सनस्क्रीन शोधत आहे
दरम्यान, यापूर्वीही माकडाच्या कारनाम्यांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. माकडे कधी काय करतील काही सांगता येत नाही. कधी ते खाऊ चोरून नेतात, कधी वस्तू चोरतात, कधी हल्ला करतात, असे त्यांचे निरनिराळे रुप आणि व्हिडीओ समोर येत राहतात.