Monkey Hula Hoop Ring Dance Viral Video : ‘पतली कमरीया मोरे हाय हायया भोजपुरी गाण्याच्या एका व्हायरल व्हिडीओनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. हिंदी गाण्यावर थिरकणाऱ्या अनेकांना तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं असेल, पण या भोजपुरी गाण्यावर चक्क एका माकडाने हुला हुप रोटेशन करुन भन्नाट डान्स केला आहे. माणसांना हुला हुप रोटेशन शिकण्यासाठी कंबर कसावी लागते, पण एका माकडाने सहजरित्या हुला हुप रोटेशन करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. माकडाची डान्स करण्याची जबरदस्त स्टाईल पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. पतली कमरिया गाण्याचं काही माणसांना तर लागलंच आहे, पण आता माकडंही या गाण्यावर थिरकायला लागल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पतली कमरीया मोरे गाण्यावर माकडाचा भन्नाट डान्स व्हायरल, पाहा व्हिडीओ

माकडाचा हा मजेशीर व्हिडीओ insta_queen_priya नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. एक माकड पतली कमरीया गाण्यावर हुला हुप रोटेशन करताना या व्हिडीओत दिसत आहे. पतली कमरीया मोरे गाण्याचे बोल सुरु होताच माकडानं भन्नाट डान्स करायला सुरुवात केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या फ्रेममध्ये माकड एका तारेच्या कुंपनावर उड्या मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ इतका जबरदस्त आहे की, माणसांना अवघड वाटणारी कसरत माकडाने सहज करुन दाखवली आहे. आता माकडांचीही बुद्धी माणासांप्रमाणेच तल्लख होत आहे, असं हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपण नक्की म्हणू शकतो. या माकडाचा जबरदस्त टॅलेंट पाहून अनेकांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसला नसेल. कारण माकडाने दाखवलेली कला एखाद्या चमत्काराप्रमाणेच असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

green mango turns yellow in a second with chemical colour video goes viral
VIDOE: हिरवागार आंबा १ सेंकदात झाला पिवळा; आंबे पिकवण्याची ‘ही’ पद्धत पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
doctor, youth, Miller Fisher syndrome,
पुणे : अचानक डोळ्यांची पापण्यांची उघडझाप थांबली अन् निघाला दुर्मीळ विकार…
Ghatkopar collapse
Ghatkopar Hoarding Collapse : ४० तासांनंतरही बचावकार्य सुरूच, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता!
Loksatta viva The Phenom Story Robot maker Angad Daryani journey to becoming an entrepreneur
फेनम स्टोरी: अंगदचा प्राण
sodyachi khichdi recipe in marathi
जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी खास “सोड्याची खिचडी” झटपट होईल तयार
Health Special, happy in old age, old age, illness, dependency, Old people, Loneliness, stress in old age, stress free in old age, Loneliness in old age, Loneliness free old age, illness in old age, fit in old age, helath in old age
Health Special: म्हातारपण आनंदी कसं राखाल?
Health Special, loksatta article, precautions to avoid acidity
Health Special: अ‍ॅसिडिटी होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्याल?
Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’

नक्की वाचा – ‘पठाण’च्या प्रदर्शनाआधीच तृतीयपंथीयाने घातलाय धुमाकूळ, ‘बेशरम रंग’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, Video पाहिलात का?

इथे पाहा व्हिडीओ

शिक्षकाच्या डान्सचा तो व्हिडीओही गाजला

पतली कमरीया गाण्यावर एका शिक्षकानेही शाळेतील वर्गात भन्नाट डान्स केला. शिक्षकाचे दिलखेचक ठुमके पाहून वर्गातील सर्व विद्यार्थी या गाण्यावर थिरकताना व्हिडीओत दिसत आहेत. या गाण्यावार शिक्षकाने आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या भन्नाट डान्सचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या डान्सचा हा व्हिडीओ @stormiismykid नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला. “माझा देश बदलत आहे, पुढं चालला आहे.”असं कॅप्शनही या व्हिडीओला देण्यात आलं. व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाल्याने ४५ हजारांहून अधिक लाईक्स या व्हिडीओला मिळाले. तसेच व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रियाही दिल्या. अशा प्रकारची वागणूक शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नातेसंबंध खराब करू शकते, असं काही जणांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं.