Girl Romantic Photoshoot With Monkey Video Viral : माणसांप्रमाणे तल्लख बुद्धी ज्यांच्याकडे असेत तो प्राणी म्हणजे निश्चितच माकड. माणसांप्रमाणे हावभाव करून दैनंदिन जीवनात आनंद व्यक्त करणाऱ्या माकडांचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होतात. हिल स्टेशनची पर्यटनस्थळे माकडांनी नेहमीच गजबजलेली असतात. काही माकडे माणसांचं मनोरंजन करतात. तर काही त्यांना त्रास देऊन पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न करतात. पण एका माकडाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण एक तरुणी माकडासोबत शूट करत असताना तो माकड थेट तिच्याजवळ जातो आणि रोमॅंटिक पोज देतो. इतकच नव्हे तर त्या तरुणीला चक्क चुंबनही घेतो. माकडाचा हा रोमॅंटिक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.

या व्हिडीओत एक तरुमी माकडासोबत फोटोसेशन करत असल्याचं पाहायला मिळत आहे. माकडांचं माणसांसोबत असलेलं बॉण्डिंग या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. कॅमेरात माकडाला कैद करत असताना तो माकडही मस्त ऐटित पोज देत तरुणीला चुंबन देत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. माकडाचे अतिशय मनमिळावू हावभाव कॅमेराबद्ध झाले असून हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. सच कडवा है नावाच्या इन्स्टाग्रामवर पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

नक्की वाचा – ‘त्या’ तरुणाला २१ तोफांची सलामी! जाळ्यात अडकलेल्या डॉल्फिनला वाचवण्यासाठी तरुणाने काय केलं? Video एकदा पाहाच

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माकडाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय की, ‘या माकडाने माणसांचं ज्या प्रकारे मनोरंजन केलं आहे ते पाहून मला आश्चर्य वाटलं.’ तर अन्य एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, मी पण माकड असतो तर…या व्हिडीओनं हजारो नेटकऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओला दहा हजारांहून अधिक व्यूज मिळाले असून शेकडोंच्या संख्येत लाईक्सही मिळाले आहेत.