असे म्हणतात की माणसेपूर्वी माकडे होती आणि नंतर हळूहळू त्यांच्या शरीरात बदल होत गेले. तुम्ही माकडांना माणसांची नक्कल करताना आणि माणसांसारखी कामे करताना अनेकदा पाहिले असेल. माकडांच्या करामातीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. याआधी उन्हाळ्याने त्रस्त झालेल्या माकडांचा स्विंमिंगपुलमध्ये पोहतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. थंड गार पाण्यामध्ये माकड खेळताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान सध्या माकडाचा असा एक व्हायरल होत असलेल्या ज्यामध्ये माकड माणासाची नक्कल करताना दिसत आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. माकड माणसासारखे बसून ताटात जेवण करत आहे. संपूर्ण संस्कृती आणि शिष्टाचारासह टेबल खुर्चीवर बसून जेवण करत आहे. व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहे.

माकडाचा राजेशाही थाट

हेही वाचा – रोज शाळेतून घरी सोडणाऱ्या रिक्षावाल्या काकांना तरुणीने दिली खास भेट! त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद एकदा बघाच! Viral Video

हा व्हिडिओ चलो बिहार घूम नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, एक माकड आरामात खुर्चीवर बसले आहे आणि समोरच्या टेबलवर एका ताटामध्ये जेवणाचा आनंद घेत आहे. ताटात डाळ, भात आणि भाज्या दिल्या जातात. तसेच जवळच एका भांड्यात दही ठेवले जाते. माकड भाजी आणि भात अगदी निवांतपणे आणि विनम्रपणे खाताना दिसत आहे. हा व्हिडीओ मागून काढण्यात आला असून, कदाचित माकड दुसऱ्यासाठी दिल्या जाणाऱ्या जेवणाचा आस्वाद घेत असल्याचे दिसते. व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले आहे की, “आज कोणीतरी एकत्र जेवायला आले वाटते”

हेही वाचा – हक्काचा भाऊ! शहीद सैनिकाच्या मुलीच्या लग्नात सीआरपीएफ जवानांनी पार पाडले भावाचे कर्तव्य, पाहा फोटो

व्हिडिओवर मजेदार कमेंट्स आल्या

व्हिडिओला १.२५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि अनेक दशलक्ष वेळा पाहिले गेले आहेत. या व्हिडिओने फूड डिलिव्हरी ॲप स्विगी इंस्टामार्टचे लक्ष वेधून घेतले. व्हिडिओवर कमेंट करताना त्यांनी लिहिले की, एक-दोन आंबे मिळाले असते तर मजा आली असती. अनेक युजर्सनी मजेशीर कमेंट्सही केल्या.

हेही वाचा – काय सांगता! इराणमध्ये पडला चक्क माशांचा पाऊस? आकाशातून खाली पडणाऱ्या माशांचा Video Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका यूजरने लिहिले की, “आणखी एक-दोन पोळ्या द्या”. दुसऱ्याने लिहिले, “त्याचे टेबल मॅनर्स माझ्यापेक्षा चांगले आहेत.” तिसऱ्याने “पापड, कोशिंबीर कुठे आहे” असे लिहिले. एकाने लिहिले, “कोणीतरी त्याच्याकडून टेबल मॅनर्स शिकले पाहिजे.”