जगात सध्या आयफोनची क्रेझ वाढताना दिसतेय. जो तो येतोय तो नवीन मोबाइल खरेदी करण्याआधी आयफोनचे कोणते मॉडेल बेस्ट यावर चर्चा करताना दिसतो. यात विशेषत: भारतीयांमध्ये आयफोनची एक वेगळी क्रेझ पाहायला मिळते. पण, सर्वांना आयफोन वापरणं परवडणारं नसल्याने तो वापरण्याचे स्वप्न मात्र अनेक जण पाहतात. पण, एका पठ्ठ्याने आयफोन्सचा अशा पद्धतीने वापर केला, जे पाहून सर्वच अवाक् झाले आहेत. त्याने आयफोनला चक्क पायाखालची जागा दिली आहे. म्हणजेच त्याने दुकानाबाहेरील फरशीवर टाइल्सच्या जागी आयफोन्स वापरले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्याला लोकांकडूनही पसंती मिळत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत आपल्याला दिसतेय की, एका मोबाईलच्या दुकानाबाहेरील पायऱ्यांवर टाइल्सच्या जागी आयफोन्स वापरले आहेत. यात १०० हून अधिक आयफोन्सचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक पायरीवर तुम्हाला वेगवेगळ्या मॉडेल्सचे, विविध रंगातील आयफोन्स सिमेंटमध्ये फिट केल्याचे दिसतील. या व्यक्तीने इतके महाग आयफोन्सचे मॉडेल्स दुकानाच्या पायऱ्यांवर वापरल्याचे पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. पण, हा व्हिडीओ नेमका कोणत्या देशातील आहे हे अद्याप समोर आलेले नाही.

Florida woman’s pet dog scares off alligator Nail-biting video is viral
“क्या मगरमच्छ बनेगा रे तू!” कुत्र्याला पाहून मगरीने ठोकली धूम, पळत जाऊन तळ्यात मारली उडी! पाहा Viral Video
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
civil service servants vehicle with a board coming to wrong side
चक्क अधिकाऱ्याच्या गाडीने मोडला वाहतूक नियम! भर रस्त्यावर थांबवताच पेटला वाद, पाहा VIDEO
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!

आयफोन्सचा हा व्हिडीओ omg_device नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केला आहे, ज्याला सोशल मीडिया युजर्स चांगलीच पसंती देत आहेत. आत्तापर्यंत २४ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. ज्यावर अनेक युजर्स कमेंट बॉक्समध्ये भन्नाट भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.