सध्या सोशल मीडियावर एका धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती बिअर पिताना दिसत आहे तर त्याचा ११ वर्षांचा मुलगा खाजगी विमान उडवत आहे. हा व्हिडिओ विमान अपघातापूर्वीचा असून या अपघातामध्ये बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २९ जुलै रोजी ब्राझीलच्या जंगलात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे १ ऑगस्ट रोजी पती आणि मुलाला दफन केल्यानंतर काही तासांनंतर पत्नीनेही आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.

द सनच्या रिपोर्टनुसार, या विमान अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ४२ वर्षीय गैरोन मैया स्वत: बिअर पिताना दिसत आहे, तर त्यांचा मुलगा विमान उडवत आहे. रनवेवरुन विमानाने उड्डाण केल्यानंतर, गैरोनमुलाला म्हणतो, “थांब, सर्व काही रेडी आहे ना? समोरही काही नाही, ठीक आहे. चल,तु पुश करु शकतोस, जा…” तो पुढे म्हणतो, “गुड लेडी लिव्हरवर हात ठेव, आणि स्पीड बघ.” काही वेळाने तो बिअर पित पित मुलाला विचारतो, “प्रवासी बिअर पिऊ शकतो, बरोबर किको?”

हेही वाचा- प्रेयसीला भेटण्यासाठी पिझ्झा घेऊन गेला तो परतलाच नाही, गच्चीवर गेलेला तरुण घाबरल्यामुळे थेट…

तर हा विमान अपघातात वडिलांच्या कृतीमुळे झाला असावा असा अंदाज असून ब्राझील पोलीस त्याचा तपास करत आहेत. वडिलांनी बिअर स्विगिंगचा व्हिडिओ केव्हा घेतला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु त्यांचा मुलगा ९.५ कोटी रुपये किमतीचे ट्विन-इंजिन बीचक्राफ्ट बॅरन ५८ उडवत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

अपघाताची चौकशी करणार्‍या अधिकार्‍यांच्या मते, वडील, गैरोन मैया याने नोव्हा कॉन्क्विस्टा येथील त्याच्या शेतातून उड्डाण केले होते आणि नंतर इंधन भरण्यासाठी एअरफील्डवर थांबले होते. डेली मेलच्या वृत्तानुसार, त्याने फ्रान्सिस्कोपासून हजार मैलांपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या कॅम्पो ग्रांडे येथील त्याच्या आईला भेटण्यासाठी जाणार होता. विमानाने संध्याकाळी साडेपाच वाजता पुन्हा उड्डाण केले आणि आठ मिनिटांनंतर क्रॅश झाले आणि रडारवरून गायब झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर हे विमान नांगरलेल्या जमिनीच्या अगदी जवळ कोसळले, त्याला उतरायला वेळ मिळाला नाही, असे तिथे शेतात काम करणाऱ्या व्यक्तीने ब्राझिलियन आउटलेट G1 ला सांगितलं. बचाव कर्मचार्‍यांनी खूप शोध घेतल्यानंतर एक ३० जुलै रोजी त्यांचे मृतदेह सापडले. अपघाताच्या कारणाचा शोध संशोधन केंद्राकडून सुरू असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर ब्राझील कायद्यानुसार विमान उडवण्यासाठी, एखाद्या व्यक्तीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे, तसेच हायस्कूल पदवीधर आणि राष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संस्थेकडे नोंदणी केलेली असेण आवश्यक आहे.