Viral video: सध्या लग्नाचा सीझन असून अनेक लग्न पार पडताना दिसत आहे. गेल्या एक महिन्यापासून अनेक लग्न पार पडली असून यामधील काहींचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लग्नातील निरनिराळे व्हिडीओ कायमच पहायला मिळतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. यामध्ये नवरा नवरी नाही तर चक्क सासू-सूनेच्या डान्सची चर्चा सुरु आहे.

लग्नापुर्वी अन् लग्नातही नवरीला सर्वात जास्त कोणाची भीती वाटत असेल तर ती म्हणजे सासू. आपली सासू कशी असेल याची धाकधुक प्रत्येक नवरीला असते. पण समजा हीच सासू ढाँसू निघाली तर…सध्या एका सासूचा व्हिडिओ सोशल मिडियावर धमाल उडवतोय.सासू-सूनेच्या नात्याबद्दल आपण आजवर अनेक किस्से ऐकले आहेत. कधी छोट्या-छोट्या गोष्टींवरुन भाडंण तर कधी मायेचा ओलावा देणारे सासू-.सूनेचे हे नाते. सोशल मीडियावर आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत,त्यामध्ये या नात्याबद्दलचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले आहेत. यात सासूने सुनेच्या समोरच असा काही धमाकेदार डान्स केला की सून आ वासून बघतच राहिली…

सासू सून म्हटलं की लोकांना आठवतं ते भांडण. म्हणजे हे अगदी समीकरणच झालं आहे. जर सासू चांगली असली तर तिला सून भांडखोर मिळते. तर कधी सून चांगली असली तर तिला सासू भांडखोर मिळते. अनेक सुनांचं असं म्हणणं असतं की त्यांची सासू कटकट करते. हे करु नको, ते करु नको असा पाढा लावत असते. पण असं असलं तरी देखील सोशल मीडिया वर सध्या असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हा व्हिडीओ आत्तापर्यंत लोकांच्या मनात असलेल्या आणि अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या सासू-सूनेच्या समीकरणाला खोटं ठरवत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल आणि तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

अशी ही बनवाबनवी या अजरामर चित्रपटाचं नाव मराठी कला विश्वाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरलं आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्षे झाली आहे तरी ही हा चित्रपट आज देखील लोकप्रिय आहे. आज देखील या चित्रपटाचा आनंद प्रेक्षक मनापासून घेत असतात.या चित्रपटातील सर्वच गाणी लोकप्रिय झाली असून या चित्रपटातील ‘हृदयी वसंत फुलताना’ या गाण्याची क्रेझ काही वेगळीच आहे. आजकालच्या पिढीतही या गाण्याची क्रेझ पाहायला मिळते. अशाच सासू-सुनेनं या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Payal Raut (@payalraut_14)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ payalraut नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.