Viral video: सासू- सुनेचं नातं म्हटलं की सर्वांना आठवतं ते म्हणजे कडाक्याचं भांडण. अनेकदा या नात्यात खटके उडतात तर अनेकदा जोरदार भांडणही होतात. सोशल मीडियावर बऱ्याचदा या नात्याबद्दले अनेक गमतीदार किस्से दाखवणारे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ काहीसा अनोखा आहे,ज्यात चक्क सासू-सुनेचा तुम्हाला धम्माकेदार डान्स पाहण्यासाठी मिळत आहे.
नकताच लग्नाचा सीझन पार पडला असून यामधील काहींचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लग्नातील निरनिराळे व्हिडीओ कायमच पहायला मिळतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. यामध्ये नवरा नवरी नाही तर चक्क सासूबाईंच्या डान्सची चर्चा रंगली आहे. आपल्या सुनेसोबत सासूबाईंनी तुफान डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तुम्हीही पाहा हा व्हिडीओ…
लग्नापुर्वी अन् लग्नातही नवरीला सर्वात जास्त कोणाची भीती वाटत असेल तर ती म्हणजे सासू. आपली सासू कशी असेल याची धाकधुक प्रत्येक नवरीला असते. पण समजा हीच सासू ढाँसू निघाली तर…सध्या एका सासूचा व्हिडिओ सोशल मिडियावर धमाल उडवतोय.सासू-सूनेच्या नात्याबद्दल आपण आजवर अनेक किस्से ऐकले आहेत. कधी छोट्या-छोट्या गोष्टींवरुन भाडंण तर कधी मायेचा ओलावा देणारे सासू-.सूनेचे हे नाते. सोशल मीडियावर आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत,त्यामध्ये या नात्याबद्दलचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले आहेत. यात सासूने सुनेच्या समोरच असा काही धमाकेदार डान्स केला की सून आ वासून बघतच राहिली…
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भर कार्यक्रमात सासू सूना डान्स करत आहे. यावेळी आजूबाजूला असलेले नातेवाईकही सासू-सुनेचा डान्स पाहून अवाक् झाले आहेत. व्हिडिओमधल्या सासूबाईंच्या डान्स स्टेप्स आणि एक्स्प्रेशन्स पाहिल्यानंतर ते अनेकांना पसंत पडत आहे. सासूबाईंच्या चेहऱ्यावरचे भाव तुम्हालाही खूप आवडतील. दोघीही इतक्या सुंदर नाचतायत, की त्यावरून तुमची नजर हटणार नाही. हा डान्स नेटकऱ्यांनाही खूप आवडलाय.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ dev__laxmi_tanwer.2012 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. एकानं म्हंटलंय, “आयुष्य खूप सुंदर आहे फक्त सासू अशी मिळायला पाहिजे”