Viral video: सध्या लग्नाचा सीझन असून अनेक लग्न पार पडताना दिसत आहे. गेल्या एक महिन्यापासून अनेक लग्न पार पडली असून यामधील काहींचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लग्नातील निरनिराळे व्हिडीओ कायमच पहायला मिळतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. यामध्ये नवरा नवरी नाही तर चक्क सासूबाईंच्या डान्सची चर्चा रंगली आहे. आपल्या होणाऱ्या सुनेच्या स्वागतासाठी सासूबाईंनी तुफान डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तुम्हीही पाहा हा व्हिडीओ…

सासू-सून यांच्यातील नातेसंबंधांवर अनेक टीव्ही शोज आहेत, ज्यामध्ये त्यांच्यातील तू-तू-मैं-मैं बघायला मिळते. अनेक सासू आणि सूनेच्या नादात मज्जा कमी आणि वाद जास्त असतात. हे अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. अनेक सून सांगतात की सासू आपल्याला आपल्या मुलीसारखी का वागवत नाही. तर सून आपल्याशी आईसारखी वागणूक का देत नाही, अशी सासूची तक्रार असते. मात्र, काही घरांमध्ये सासू-सुनेचे नाते खूपच मस्त असते, याचे ताजे उदाहरण म्हणजे सोशल मीडियावर व्हयरल झालेला एक व्हिडीओ.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सासूने बॉलिवूडमधील मेला या चित्रपटातील ‘कमरिया लचके के जिया मेरा धडके रे’ या गाण्यावर डान्स केला आहे. यावेळी सासूबाईंचा उत्साह पाहून तुम्हीही कौतुक कराल. यावेळी त्या वेगवेगळ्या स्टेप्सही मारत आहेत. त्यांच्या बाजूला दोन मुलं आहेत ते सुद्धा डान्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘आज मी आणखीच श्रीमंत झालो’; 12th नापास IPS अधिकाऱ्याच्या भेटीने आनंद महिंद्रा भारावले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर @creativewedding.in या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. व्हिडीओ पोस्ट करत त्यावर “मुलाची आई नव्या सूनेचं स्वागत करताना.” असं कॅप्शन देण्यात आलं आहे.