एअरपोर्टवर आईचं स्वागत करण्यासाठी आलेल्या मुलाचंच चप्पलाने केलं स्वागत ! VIRAL VIDEO पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

खूप दिवसांनतर आई आलीये या आनंदात मुलगी एअरपोर्टवर तिचं स्वागत करण्यासाठी गेला खरा…पण त्यानंतर आईनेच त्याचं ज्या पद्धतीने स्वागत केलं ते पाहून तुम्हाला हसू आवरता येणार आहे. एकहा हा VIRAL VIDEO पाहाच…

Mother-Beat-Son-Video-Viral
(Photo: Instagram/ anwar)

Mother Beat Son Video: आई आणि मुलाचं अत्यंत नाजूक नातं असतं. हे नातं असं आहे जे सांगता येत नाही आणि ते बोलून जितकं व्यक्त करावं तितकं कमी असतं. आई हा विषयच इतका मोठा असतो की बाकी सगळे विषय त्यापुढे फिके पडतात. म्हणूनच कधी कधी मुलासाठी आई आपली जीव धोक्यात घालायला सुद्धा तयार होते. आई जेवढे प्रेम आपल्या मुलांवर करते तेवढे प्रेम ती जगात इतर कोणावर करू शकत नाही. म्हणूनच असं म्हणतात की आईचं प्रेम शब्दात व्यक्त करता येत नाही. पण सध्या एका आईचा एक विचित्र व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये आईने आपल्या मुलासोबत असं काही केलंय की लोक बघतच राहिले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला आई-मुलाचा व्हिडीओ एका विमानतळावरचा असल्याचं दिसत आहे. एक मुलगा विमानतळावरून आईला घ्यायला जातो. मुलाच्या एका हातात फुलांचा एक गुच्छ सुद्धा दिसून येतोय आणि दुसऱ्या हातात एक बोर्ड दिसत आहे, ज्यावर लिहिले होते – ‘आम्हाला तुझी खूप आठवण येत होती.’ यानंतर व्हिडीओमध्ये मुलाची आई समोरून येताना दिसत आहे. यानंतर पुढे जे घडते ते पाहून लोक हैराण झाले आहेत. हे दृश्य पाहून सुरूवातीला अनेकजण घाबरून जातात पण सगळा प्रकार कळल्यानंतर मात्र सारेच जण पोट धरून हसू लागले आहेत.

आपल्या मुलाला विमानतळावर आलेलं पाहून आईने तिच्या पायातली चप्पल काढली आणि चप्पलेने चक्क मुलालाच बदडवून काढलं. हे पाहून जवळ आजुबाजूला असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमलते. ही आई आपल्या मुलाचा लागोपाठ चपलेने पाहूणचार करताना दिसून येतेय. हा व्हिडीओ पाहून सुरूवातीला प्रश्न पडू लागतो की, या व्हिडीओमधली आई तिच्या मुलाला का बरं इतकं मारत असेल? पण या प्रश्नाचं उत्तर जेव्हा कळतं तेव्हा मात्र सारेच जण आई-मुलाचं हे अनोखं नातं पाहून भावूक झाले. तुम्हीच प्रत्यक्ष पाहा हा व्हायरल व्हिडीओ.

आणखी वाचा : PHOTOS : एका VIRAL VIDEO मुळे मालामाल झाला हा ‘Paragliding Man’; आज लाखोंमध्ये कमवतोय…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा : दाढी करण्यासाठी सलूनमध्ये पोहोचले हे स्टायलिश माकड; VIRAL VIDEO पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

‘अनवर जिबावी’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरू हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. ‘आई परत आलीये’ अशी कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहून साऱ्यांना हसू आवरणं कठीण होत आहे. आईचं स्वागत करण्यासाठी गेलेल्या मुलाचंच असं काही स्वागत होईल, अशी कल्पना त्या मुलाने सुद्धा केली नसेल. लोकांना हा व्हिडीओ खूपच आवडलाय. या व्हिडीओला आतापर्यंत १४० मिलियन लोकांनी पाहिलंय. तर तब्बल पाच मिलियन लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. तसंच ६४ हजार लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्स करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी तर आईचं प्रेम व्यक्त करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय असल्याचं देखील सांगितलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mother meeting her son after a long time she started raining slippers at the airport it will be fun watching mother beat son at airport by sandle funny video google trending video today prp

ताज्या बातम्या