Viral video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांचे अनेक व्हिडीओ नेहमी चर्चेत येतात. कधी मजेशीर व्हिडीओ असतात तर कधी आश्चर्यचकीत करणारे व्हिडीओ असतात. काही व्हिडीओ जीवनाचे सार सांगून जातात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा जीवन जगण्याचा कानमंत्र देताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडीओ पाहून काही लोकं आजोबांचे चाहते होईल. यामध्ये त्यांना विचारलं की, आई मोठी की बाप मोठा? यावर आजोबांनी दिलेलं उत्तर ऐकून सर्वच कौतुक करत आहेत.

आयुष्य कसं जगावं, हे अनेकांना वेळ गेल्यानंतर कळते. आयुष्याचं कटू सत्य आजोबांनी या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. भरभरुन जगण्याचा आणि इतरांबरोबर प्रेमाने वागण्याचा सल्ला सुद्धा त्यांनी दिलाय. आजोबांचा हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या आजोबांना प्रश्न विचारला की आई मोठी की बाप मोठा? यावर आजोबा म्हणतात, सगळ्यात श्रेष्ठ जर कोणी असेल तर ती आई.. देवाच्या आधीही जर कुणी असेल तर तीसुद्धा आईच आहे. ज्याच्याकडे आई आहे त्याच्याकडे अख्खी दुनिया आहे, ज्याच्याकडे आई नाही त्याच्याकडे काहीच नाही. आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. मग ती माणसांची आई असो किंवा प्राण्यांची, आई ही आईच असते. आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते. माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल यावीत आता दु:खे खुशाल. अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडओ hearttouching0419 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. एकानं म्हंटलंय की, “बाबा तुमच खर आहे आई मोठी आहे पण त्याच आईला आणि पोरला सुखी ठेवण्यासाठी रात्र आणि दिवस कष्ट करत असतो तो म्हणजे बाप. एखाद्या आईला विचारून बघा पोराचा बाप नसला की कसं असतं जीवन. आई जेवढी महत्त्वाची आहे तेवढाच बाप पण” …आणखी एकानं म्हटलंय की, “अहो बाबा पण बाप पण आयुष्यभर कष्ट करून कुटुंबाचा सांभाळ करत असतो शिक्षण मुलांच लग्न , दोन्ही ही परमेश्वराचे रूप आहेत.”