बाळाच्या हितासाठी जगातील कोणतीही आई स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मोठ्या संकटाला तोंड देऊ शकते याचेच एक उदाहरण ऑनलाईन पाहायला मिळत आहे. एका व्हायरल व्हिडीओ मध्ये एक महिला तिच्या बाळाला वाचवण्यासाठी चक्क भल्यामोठ्या कोब्राचा सामना करताना दिसत आहे. कर्नाटक मध्ये घडलेला हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून त्याची एक क्लिप सध्या ऑनलाईन बरीच व्हायरल होत आहे. हा थरार पाहून नेटकरी सुद्धा या महिलेच्या धाडसाला दाद देत आहे.

आपण व्हिडीओ मध्ये पाहू शकता की, एक महिला तिच्या मुलाला घेऊन घराबाहेर येत आहे. अचानक त्यांच्या पायाखाली एक साप येतो, साहजिकच त्याची कल्पना नसल्याने महिला चुकून या सापावर पाय देणार इतक्यातच साप फणा काढून फुत्कारु लागला. हे पाहून महिला एक क्षण स्तब्ध झाली आणि तिला काय करावे कळत नव्हते तितक्यात साप उभा राहून तिच्या बाळाला चावण्यासाठी पुढे येऊ लागला. हे पाहताच महिलेने तत्परतेने या सापाला ढकलून बाजूला केले व ती बाळाला सुरक्षित ठिकाणी घेऊ गेली.

पहा Viral Video

Monsoon Hacks: पावसाळ्यात गांडूळ, गोम, माश्यांनी घरात घातलंय थैमान, करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा असे प्रकार घडतात. आपल्या बिळातून बाहेर आलेले अनेक प्राणी घरात आडोसा घेण्यासाठी शिरतात, अशावेळी आपण सतर्क राहायला हवे. यापूर्वी सुद्धा एका प्रसंगात चक्क चार विषारी साप एका घरात शिरण्याचा प्रयत्न करत होते मात्र या कुटुंबाच्या पाळीव कुत्र्याने त्यांच्याशी लढून त्यांना मारून टाकले होते. या लढाईत दोघांचाही मृत्यू झाला होता.