scorecardresearch

Premium

आईने चप्पल दाखवताच मुलगा धावत पळत सुटला, पाहा मजेशीर व्हिडीओ

एक मायलेकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आपले बालपण आठवणार.

mother show a chappal footwear to her child
(Photo : Twitter)

Viral Video :

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात काही मजेशीर असतात तर काही भावनिक असतात. असाच एक मायलेकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आपले बालपण आठवणार.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
sharad pawar narendra modi (1)
“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!

या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की २ -३ वर्षाचा एक मुलगा कपाटात लपलेला आहे. आई त्याला बाहेर येण्यासाठी सांगते पण तो आईचं ऐकत नाही पण जेव्हा आई हातातली चप्पल काढून त्याला दाखवते तेव्हा मात्र मुलगा लगेच बाहेर येतो आणि पळायला लागतो. आई चपलेने मारणार, या भीतीने मुलगा पळतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा :ब्रा साईझनुसार महिलांना फ्री ड्रिंक्स, क्लबची विचित्र ऑफर पाहून लोक भडकले; A कपसाठी एक ड्रिंक तर C साईजला…

@Jatinde19733255 या ट्वीटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “माँ का चप्पल दुनिया का सबसे ताकतवर हथियार है” म्हणजेच आईची चप्पल हे जगातील पावरफूल शस्त्र आहे.

हेही वाचा : नाल्यातील पाणी घ्यायचा अन्…, नारळपाणी विक्रेत्याचं किळसवाणं कृत्य कॅमेऱ्यात कैद, संतापजनक Video व्हायरल


हा व्हिडीओ पाहून अनेकांना आपल्या बालपणीची आठवण येत आहे. या व्हिडीओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया आल्या आहेत. एक युजर लिहितो, ‘हा आशीर्वाद आहे’ तर अन्य युजर लिहितो, ‘तुम्ही खरं बोलत आहात सर’!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-06-2023 at 14:56 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×