Mother son Dance Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी लहान मुले तर कधी वयोवृद्ध माणसे डान्स करताना दिसतात. तुम्ही आजवर अनेक डान्सचे व्हिडीओ पाहिले असेल पण सध्या माय लेकाचा असा एक डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे की पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हायरल व्हिडीओमध्ये मुलगा त्याच्या आईबरोबर सुंदर डान्स करताना दिसत आहे. माय-लेकाची जुगलबंदी पाहून तुम्हीही डान्स केल्याशिवायर राहणार नाहीत. सध्या सोशल मीडियावर असाच एका माय-लेकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तरुणानं त्याच्या आईसोबत भन्नाट डान्स केला आहे.

पळता पळता आपल्याला ठेच लागली आणि तोंडून आपसूक आईऽऽऽगं अशी आरोळी येतेच येते. आई आणि मुलांचं नातं इतकं नाजुक आणि घट्टं असतं की, त्या नात्याला कोणतीच उपमा नाही की तुलना नाही. आईने मुलाला जन्म दिल्यापासून तर त्याला त्याच्या पायावर उभं करण्यापर्यंत ते शेवटच्या श्वासापर्यंत आई मुलाच्या सोबत असते. अशातच माय-लेकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

तरुणाने केला आईबरोबर जबरदस्त डान्स!

आई आणि मुलांचे नाते हे जगावेगळे असते. मुलाच्या आनंदासाठी आई वाट्टेल ते करते. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की मुलासाठी आई त्याच्याबरोबर डान्स करते. ती मुलाबरोबर सुंदर डान्स करताना दिसते. ‘काखेत कळसा गावाला वळसा कशाला’ या लोकप्रिय गाण्यावर आई आणि मुलगा डान्स करताना दिसतात. त्या दोघांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या त्यांचा डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.’काखेत कळसा गावाला वळसा’ हे गाणं आधीपासूनच लोकप्रिय आहे. मात्र या मायलेकाच्या अफलातून सादरीकरणामुळे गाण्याला नव्याने प्रसिद्धी मिळाली आहे.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर shankar_dhavali या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “अरे भारच” तर आणखी एकानं प्रतिक्रिया दिली आहे की, “एकदम भारी जोडी.”