सोशल मीडियावर सध्या एक आई आपल्या मुलासाठी जेवण बनवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दुर्दैवाने हा व्हिडीओ या महिलेचा शेवटचा व्हिडीओ ठरला. कारण हा व्हिडीओ शूट केल्याच्या काही दिवसांनंतरच या महिलेचा मृत्यू झाला. हा व्हिडीओ अतिशय भावुक असून तो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आले.

प्रत्येक आईचा आपल्या मुलांवर खूप जीव असतो. ती आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. मग तिची स्वतःची स्थिती कितीही गंभीर असली तरी तिला त्याची काळजी नसते. दरम्यान, सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ चीनमधील असल्याचं सांगितलं जातंय. २० वर्षीय डेंगने आपल्या कर्करोगग्रस्त आईचा जेवण बनवतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उत्तर-पूर्व चीनच्या डालियानमधील रहिवासी डेंग याने हा व्हिडीओ शेअर केला असून त्याने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहलंय, “आई, आता शांतपणे आराम कर. आता कोणीही तुला हरवू शकत नाही.” मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच डेंग यांच्या आईचे निधन झाले. आईचे निधन होण्याच्या काही दिवस आधीच त्याने हा व्हिडीओ तयार केला होता. डेंगने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या आईच्या तीन केमोथेरपी झाल्या होत्या. मात्र त्याच्या आईने कधीही त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार केली नाही.

‘ट्विटर तेरे टुकडे होंगे’ गैंग को भी $8 देने पडेंगे’ इलॉन मस्क यांचं हिंदीत Tweet? जाणून घ्या नेमकं प्रकरण

डेंगने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या आईला फेब्रुवारी महिन्यातच त्यांच्या कर्करोगाविषयी माहिती मिळाली होती. मात्र कुटुंबीय काळजी करतील म्हणून त्यांनी याबाबत कोणालाही सांगितले नाही. तिसऱ्या केमोथेरपीनंतर त्यांनी डेंगला ‘काय खाणार?’ असे विचारले. यानंतर त्यांनी जेवणाची तयारी केली आणि त्या स्वतः स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवू लागल्या.

यावेळी डेंगची आई अतिशय थकलेली वाटत होती. मात्र तरीही त्या आपल्या मुलासाठी जेवण बनवत होत्या. दरम्यान, डेंग याच्या या व्हिडीओला जवळपास ८ लाख लाइक्स मिळाले आहेत. डेंग म्हणाला, “माझ्या आईला जेवण बनवताना पाहून मी माझे अश्रू रोखू शकलो नाही. त्या रात्री मी संपूर्ण जेवण संपवले. या जेवणाची चव मी कधीही विसरणार नाही. कदाचित माझ्या आईला माहित होते की मी ब्लॉगर आहे. म्हणूनच तिने शेवटची भेट म्हणून हा व्हिडीओ मला दिला आहे.”

Video : चालत्या बाइकवर कपडे काढून तरुणांनी केले असे काही…; मात्र, पोलिसांच्या एका कृतीने मुलांची चांगलीच जिरली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, डेंग याचा हा व्हिडीओ पाहून नेटकरीही खूप भावूक झाले आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटले आहे, “दुखी होऊ नको. त्यांनी फक्त तुला साथ देण्याची पद्धत बदलली आहे. तुझी आई तुझ्याबरोबरच आहे. त्या कानामागील हवेच्या आवाजाच्या रूपात तुझ्याबरोबर आहेत, त्या आकाशातील ताऱ्यांच्या रूपात तुझ्याबरोबर आहे. त्या सदैव तुझ्याबरोबर राहतील.”