मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. आपण जिच्यामुळे आहोत, त्या आपल्या आईचा हक्काचा दिवस म्हणजे मातृदिन होय. काल (रविवार, १४ मे) भारतासह जगभरात मदर्स डे मोठ्या जल्लोषामध्ये मदर्स डे साजरा केला गेला. काहींना आपल्या आईसाठी जेवण बनवले तर काहींनी तिच्यासाठी गिफ्ट खरेदी केले. त्यात बऱ्याच जणांनी आपल्या आईचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. अशाच एका व्हायरल व्हिडीओची डिजिटल माध्यमांमध्ये चर्चा आहे.

या व्हिडीओमध्ये एक हवाईसुंदरी म्हणजेच एअर हॉस्टेस आपल्या आईविषयी बोलताना दिसते. सर्वप्रथम ती विमानातील सर्व प्रवाश्यांना समोर जाते आणि माईक हातामध्ये घेऊन बोलायला लागते. सुरुवातीलाच ती एअर हॉस्टेस स्वत:च्या आईची ओळख करुन देते. त्यासुद्धा एअर हॉस्टेस म्हणून काम करत असल्याचे व्हिडीओ पाहताना लक्षात येते. “मी माझ्या आईला केबिन क्रूमध्ये काम करताना लहानपणापासून पाहत आली आहे. आता मी तिच्यासारखी एअर हॉस्टेस म्हणून काम करत आहे”, असे ती तरुणी प्रवाश्यांना सांगते.

Viral Video The Air India staff who loads the luggage on the plane throws passenger musical instruments
धक्कादायक! सामान विमानात चढवताना प्रवाशाचे वाद्य दिलं फेकून; एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा ‘हा’ VIDEO पाहाच
Bikini-clad woman rides crowded Delhi bus
बसमध्ये बिकिनी घालून प्रवास करणाऱ्या महिलेला पाहून ओशाळले प्रवासी; व्हिडीओ होतोय व्हायरल
How to restrict WhatsApp media downloads
‘गुड मॉर्निंग’च्या फोटोने गॅलरी फुल? WhatsApp सेटिंगमधील ‘हा’ एक बदल करील तुम्हाला मदत; पाहा टिप्स….
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…

आपली लेक बोलत असताना त्या वयस्क एअर हॉस्टेसच्या डोळ्यातून पाणी येत असते. हा प्रसंग पाहून विमानातील सर्व प्रवासी देखील भावूक होतात. व्हिडीओच्या शेवटी त्या तरुण एअर हॉस्टेसची आई भावूक होत तिच्या गालावर पापा घेते. मदर्स डेच्या दिवशी नेमक्या त्या दोघीचीही ड्युटी एकाच विमानामध्ये लावलेली असते. या मायलेकी इंडिगो एअरलाइन्समध्ये काम करत असल्याचे त्यांच्या गणवेशावरुन समजते.

आईशी Prank करायला गेली आणि तोल गेल्याने भिंतीवर जोरात आपटली, तरुणीचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

इंडिगो एअरलाइन्सने या प्रसंगाचा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत सर्व प्रवाश्यांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडीओच्या त्यांनी “जमिनीपासून आकाशापर्यंत ज्यांनी मातृत्वाचा आधार दिला आहे, त्या सर्वांना हॅप्पी मदर्स डे” हे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. ७५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओवर भावूक कमेंट्सचा वर्षाव होत असल्याचेही पाहायला मिळते.