scorecardresearch

Premium

जिनं पंख दिले…मुलाला पायलटच्या गणवेशात पाहून आईला अश्रू अनावर; हृदयस्पर्शी VIDEO पाहून नेटकरी भावूक

Viral video : मुलाला पायलटच्या गणवेशात पाहून आईला अश्रू अनावर

Mothers Priceless Reaction After She Found Out Her Son Is The Pilot On Her Flight Watch Viral Video On Social Media
विमानात बसलेल्या आईला जेव्हा मुलगा पायलटच्या गणवेशात दिसतो

Viral video : स्वत:ला विसरून मुलांना घडविणारी, त्यांच्यावर संस्कार करणारी असते ती आई. मूल आणि कोणतेही संकट यांच्यामध्ये आई उभी असते, असे म्हणतात. मुलांचे आयुष्य मार्गी लागावे म्हणून अहोरात्र वाटणाऱ्या काळजीमध्ये, मुलांवर आलेल्या कोणत्याही संकटांशी सामना करण्यासाठी असलेल्या मातृशक्तीमध्ये.आईला आपल्या मुलांचं किती कौतुक असतं हे वेगळं सांगायची गरज नाही.

जगानं झिरो म्हंटलं तरी तिच्यासाठी तिचा मुलगा हा नेहमी हिरोच असतो. मुलाचं प्रत्येक यश हे तिच्यासाठी मोठा सोहळा असतो. अशाच एका माय-लेकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्या आईनं पंख दिले तिला पहिल्यांदा विमानातून घेऊन जाणाऱ्या या मुलाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

Shani dev Favourite Rashi
Shani Dev : शनिदेवाची ‘या’ प्रिय राशींवर असते नेहमी कृपा; जाणून घ्या, तुमची रास यात आहे का?
girl was sexually assaulted
डोंबिवलीत चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
nashik assaulted accused sentenced in jail woman denied marriage
नाशिक : युवतीवर प्राणघातक हल्ला, आरोपीला पाच वर्ष तुरुंगवास
What should a person choose in the end To live in happiness as much as possible or to be happy in living as much as possible
सांधा बदलताना : समाधान!

झालं असं की ही महिला विमानाने प्रवास करणार असते, मात्र आपला पायलट मुलगा हेच विमान चालवणार आहे याची तिला कल्पना नसते. मात्र जेव्हा ती विमानात चढते तेव्हा त्या ठिकाणी मुलाला पाहून ती प्रचंड खूश होते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलाला पाहून तिचा आनंद गगनात मावत नाहीये. मोठ्याने ओरडताना दिसते. मग ती त्याला घट्ट मिठी मारते. हे पाहून विमानातले इतर प्रवासीही खूश होतात आणि त्यांच्या आनंदात सामील होतात. मुलाने पाहिलेलं स्वप्न पूर्ण होताना पाहून त्या आईला खूप आनंद झाला आहे, सोबतच मुलगा चालवत असलेल्या विमानात बसण्याचं तिचं स्वप्नही पूर्ण झालं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> एवढं मनमुराद जगता यायला हवं! या महिलेचे अमिताभ बच्चनही झाले फॅन, VIDEO पाहून कराल कौतुक

आईच्या मायेची सर जगात कुठेच नाही, त्यामुळे हा आई आणि मुलाच्या भेटीचा व्हिडीओ पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत. या व्हिडीओला लाखो व्ह्यूज गेले असून नेटकरी अनेक प्रतिक्रियाही देत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mothers priceless reaction after she found out her son is the pilot on her flight watch viral video on social media srk 1

First published on: 01-12-2023 at 17:19 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×