Shocking video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडीओ हसवणारे असतात तर काही व्हिडीओपाहून धक्का बसतो. सोशल मीडियाच्या काळात काहीही लपून राहत नाही, त्यामुळे कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे समोर आली आहे. झालं असं की, मुंबईहून उल्हासनगरच्या दिशेने जाणारी लोकल ट्रेन अचानक ट्रॅकवर थांबवण्यात आली. लोकल ट्रेन थांबवण्याच्या मागचं कारण ज्यावेळी समोर आले तेव्हा सर्वचजण आवाक झाले. मोटरमनला लघुशंका आल्याने त्याने चक्क लोकलच थांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. एवढंच नाहीतर त्यानं चक्क रेल्वे ट्रॅकवर उतरून लघवी केली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये मोटरमन ट्रेन थांबवून रेल्वे रूळांवर लघुशंका करताना दिसत आहे. त्यानंतर पुन्हा तो आपल्या केबीनमध्ये जाऊन गाडी सुरू करतो. मोटरमनने अचानक गाडी थांबवली असल्याने प्रवाशांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात आले. परंतु कोणत्याही प्रवाशाने याबाबत तक्रार केली नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक स्तरातून निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, हे नैसर्गिक कृत्य असल्याचे सांगत यावर कारवाईची तरतूद नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.हा जुना व्हिडीओ असला तरी सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

साधारणपणे, जर एखाद्या लोको पायलटला लघुशंकेला जायचं असेल, तर त्यांना परिस्थितीची माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्षाला एक एसओएस पाठवावा लागतो, त्यानंतर पुढील प्रमुख स्टेशनवर व्यवस्था केली जाते. तर उपनगरीय गाड्यांमधील मोटरमनसाठी, नियमानुसार त्यांना शौचालय वापरण्यापूर्वी त्यांचा प्रवास पूर्ण होईपर्यंत वाट पहावी लागते.दरम्यान, रेल्वेने हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया दिली होती की, हे नैसर्गिक कृत्य असल्याचे सांगत यावर कारवाईची तरतूद नसल्याचे म्हटले आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ udaykumarshiroorkar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक चिडले असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तर काहीजण त्या मोटानमॅनची बाजू घेत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

योगायोगाने, काही वर्षांपूर्वी नालासोपारा आणि वसई स्थानकांदरम्यान एका सहाय्यक लोको पायलटने लांब पल्ल्याच्या एसी ट्रेन थांबवून रेल्वे रुळांवर लघवी केल्याची अशीच एक घटना घडली होती. ही संपूर्ण घटना एका स्थानिक रहिवाशाने पुन्हा कॅमेऱ्यात कैद केली.