उद्योगपती आनंद महिंद्रा आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्याला आश्चर्यचकित करत राहतात. महिंद्रा ग्रुपच्या चेअरमन आनंद महिंद्रा यांचे ट्विटर हँडल मनोरंजक, प्रेरणादायी आणि विनोदी ट्विट्सने भरलेले आहे. सोशल मीडियावर हटके कल्पनांचं कौतुक करणारे आनंद महिंद्रा सर्वसामान्य लोकांमध्येही प्रचंड लोकप्रिय आहेत. असाच एक व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे. असे म्हटले जाते की तिथून पृथ्वीवरचा स्वर्ग दिसतो. परंतु प्रत्येकाला हे दृश्य प्रत्यक्षात बघायला मिळत नाही. मात्र, आता स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या या जमान्यात लोकांना एव्हरेस्टच्या माथ्यावरून स्वर्गाचा नजारा घरात बसून पाहता येणार आहे. आतापर्यंत तुम्ही माउंट एव्हरेस्टचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहिले असतील, परंतु आता घरी बसून या पर्वतांच्या ३६० डिग्री दृश्याचा आनंद घ्या.

यामध्ये सर्वोच्च माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर गिर्यारोहक दिसत असून, ते हा व्हिडिओ बनवताना दिसत आहेत. उद्योगपती आनंद मंहिंद्रा यांनी व्हिडीओ शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – लग्नात हार घालताना नवरदेवाची विचित्र अट, संतापलेल्या नवरीने नवरदेवाला बांधले, वऱ्हाड्यांना कोंडले; Video व्हायरल

माउंट एव्हरेस्ट नेहमीच कोणत्या ना कोणत्या घटनेमुळे चर्चेत असतो. चला जाणून घेऊया याबद्दल काही खास गोष्टी. आतापर्यंत ४ हजारांहून अधिक लोकांनी ९ हजारांहून अधिक वेळा एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. तीव्र थंडी आणि कमी ऑक्सिजनमुळे, माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात धोकादायक पर्वतांपैकी एक आहे, त्याला चोमोलंगमा कोमोलंगमा आणि सागरमाथा देखील म्हणतात.

एक महत्वाची गोष्ट म्हणजे माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत नाही. उलट तो समुद्रसपाटीपासून सर्वात उंच पर्वत आहे. पण हवाईचा माऊना किया (Mauna Kea) पर्वत हा सर्वात उंच पर्वत आहे. हवाईच्या माऊना किया पर्वताचा शिखर पायथ्यापासून १०,२१० मीटर उंच आहे. परंतु त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची केवळ ४२०५ मीटर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.