Unique Wedding Viral Video : सोशल मीडयावर सध्या एक फोटो आणि व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. १०३ वर्षांच्या वृद्धाने ४९ वर्षीय फिरोज नावाच्या महिलेशी लग्न केलं आहे. यासंदर्भातला हा व्हिडीओ आहे. या अनोख्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. २०२३ मध्ये या दोघांचं लग्न झालं आहे. मात्र सध्या या दोघांचा फोटो आणि एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे लग्न अनोखं अशासाठी आहे कारण हबीब नजर यांचं वय १०३ वर्षे आहे. तर त्यांनी ज्या महिलेशी लग्न केलं आहे त्या फिरोझचं वय ४९ वर्षांचं आहे. गेल्या वर्षीच या दोघांचा निकाह झाला.

कोण आहेत हबीब नजर?

हबीब नजर हे भोपाळमध्ये राहणारे स्वातंत्र्य सैनिक आहेत. त्यांनी वयाच्या १०३ व्या वर्षी फिरोज या महिलेशी लग्न केलं. रविवारी म्हणजेच २८ जानेवारीच्या दिवशी या दोघांच्या निकाहाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हबीब नजर हे एका रिक्षात आपल्या पत्नीसह निकाल करुन येताना दिसत आहेत. लोक हबीब नजर यांना लग्नाच्या शुभेच्छा देतानाही दिसत आहेत. तसंच हबीब नजर यांनीही मंद स्मित करत लोकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आहेत. @SuyashS5 या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हबीब नजर आणि फिरोज यांनी का केला निकाह?

हबीब नजर भोपाळच्या इतवारा भागात राहात आहेत. ते स्वातंत्र्य सैनिक आहेत, त्यांचा पहिला निकाह नाशिकमध्ये झाला होता. तर दुसरा निकाह लखनऊमध्ये झाला होता. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचं निधन झालं. त्यानंतर त्यांना एकटेपणा वाटू लागला.त्यामुळे त्यांनी फिरोज या ४९ वर्षीय महिलेशी लग्न केलं आहे. त्यांचा हा निकाह सोशल मीडियावर चर्चेत आहे. फिरोज या देखील एकट्याच होत्या, त्यांच्या पतीचं निधन झालं आहे. तेव्हापासून त्यांनाही एकटेपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांनी आणि हबीब नजर यांनी निकाह केला. हबीब नजर यांची काळजी घेण्यासाठी कुणीही नव्हतं म्हणून मी त्यांच्याशी निकाह केला असं फिरोज यांनी सांगितलं आहे.