Man Drowns River : नदीकाठ किंवा समुद्रकिनारा कितीही सुंदर वाटत असला, तरी तो धोकादायक ठरू शकतो. जर योग्य खबरदारी घेतली नाही, तर तिथे जीव गमावण्याची शक्यता असते. ममध्य प्रदेशमधील सिवनी जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शनिवारी एका तरुण नदीत पडलेली चप्पल उचलताना आपला जीव गमवावा लागला. हा तरुण आपल्या मित्रांबरोबर पिकनिकला गेला होता, पण चुकून पाण्यात गेलेली चप्पल काढताना तो प्रवाहात वाहून गेला. विशेष म्हणजे या संपूर्ण घटनेचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आयुषचा मृत्यू आणि अखेरचे क्षण

एका नदीत चप्पल उचलण्याचा प्रयत्न करणारा २० वर्षीय तरुणाचा पाय घसरून पडला अन् बुडून मृत्यू झाला. ही घटना परिसरातील प्रसिद्ध पिकनिक स्पॉट ‘परेवा खो’ येथे घडली. India Today च्या वृत्तानुसार, मृत युवकाचे नाव आयुष असून तो आपल्या पाच मित्रांबरोबर या ठिकाणी फिरायला आला होता. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आयुषची एक चप्पल नदीत पडली आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे वाहून जाऊ लागली. ती परत मिळवण्यासाठी त्याने एका लाकडी काठी वापरून ती चप्पल काढण्याचा प्रयत्न करत होता. पण नदीच्या पाण्याचा खूपच जोरदार होता, त्यामुळे चप्पल आणखी पुढे जाऊ लागली. जेव्हा त्यामुळे तोही चप्पल काढण्यासाठी आणखी पुढे गेला अन् नदीच्या पाण्याच्या आणखी जवळ गेला जे अत्यंत धोकादायक होते. चप्पल काढण्याच्या नादात त्याचा पाय घसरला अनं तो पाण्यात पडला.

प्रयत्न केले, पण वाचवता आलं नाही

घटनेदरम्यान उपस्थित असलेले त्याचे मित्र व अन्य लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते प्रयत्न अयशस्वी ठरले. नंतर पोलि‍सांनी शोध मोहीम राबवली आणि दुसर्‍या दिवशी आयुषचा मृतदेह सापडला. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अशीच दुसरी घटना महाराष्ट्रातही

हेच काहीसं घडलं महाराष्ट्रातील भिवंडीतील कमवारी नदीत. १३ जुलै रोजी १४ वर्षीय मुलगा चप्पल उचलण्यासाठी नदीत गेला आणि बुडून गेला. दुर्दैव म्हणजे त्याच्या मित्रांनी घाबरून पळ काढला आणि कुटुंबियांना याची माहिती दिली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याच दिवशी महाराष्ट्रातील मुरूडमधील फणसाड धरणात आणखी एका २४ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला. तो देखील ११ मित्रांसह पिकनिकसाठी गेला होता. Times of India च्या माहितीनुसार, तीन गोताखोरांनी ३८ फूट खोल पाण्यातून त्याचा मृतदेह बाहेर काढला.