सर्वच पालकांच्या आपल्या मुलांकडून भरपूर अपेक्षा असतात, मुलांनी आपल्या इच्छा पूर्ण कराव्या असं सर्व आई-वडिलांनी वाटत. त्यासाठी आई वडिल मुलांना शिकवतात, आपल्या पायवर उभे करतात. दरम्यान मुलगा हा आईच्या जास्त जवळ असतो. त्यामुळे आईच्याही आपल्या मुलाकडून खूप अपेक्षा असतात. मुलंही आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतात. मात्र सध्या समोर आलेल्या प्रकरणात एका आईचं स्वप्न मुलानं नाहीतर चक्क सुनेनं पूर्ण केलंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून “सून असावी तर अशी” असं कौतुक नेटकरी करत आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पोलीस उपनिरिक्षक अक्षदा इंगळे यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अक्षदा यांच्या सासूबाईंची इच्छा होती की, मुलाच्या लाल दिव्याच्या गाडीतून फिरायचं आहे. मात्र त्यांची ही इच्छा मुलाने नाहीतर सुनेनं पूर्ण केली आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की सुन अक्षदा यांनी सासूला त्यांच्या लाल दिव्याच्या गाडीत बसवलं आहे. यावेळी सासूच्या चेहऱ्यावरील आनंदही पाहायला मिळत आहे. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. कालपर्यंत जे सासू सुनेचं नात म्हणजे भीती होती, तेच नाते आज आई आणि मुलीच्या रुपात बघायला मिळायची अनेक उदाहरणे दिसतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: ट्रेकिंग करताना अचानक कडा कोसळली; दगडाखाली पाय अडकला अन्..तरुणाचा दुर्दैवी शेवट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजही आपल्या समाजात सूनेला गुलाम समजण्याची वृत्ती आहे. हिने आपलंच ऐकलं पाहिजे. आपण म्हणू तसं राहिलं पाहिजे, आपल्या शब्दाबाहेर नको, आपण म्हणू ते केलं पाहिजे ही वृत्ती घराघरात दिसते. मात्र आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये हे सगळं कधीच मागे पडलं आहे याची जाणीव होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी अक्षदा यांचं खूप कौतुक करत आहेत. तर सुन हवी तर अशी अशाही प्रतिक्रिया येत आहेत.