Mumbai Leopard Video Viral: मुंबई आणि गर्दी हे तर समीकरणच झाले आहे. शहर व उपनगरात दाट लोकवस्ती आहे, तर शहरातील लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, याच वस्तीमध्ये आता प्राणी येताना दिसत आहेत. मुंबईच्या आरे कॉलनीत अनेकदा बिबट्या कॅमेऱ्यात कैद झालाय. दरम्यान, आता पुन्हा एकदा बुधवारी रात्री मुंबईतील आरे मिल्क कॉलनीतील झाडाझुडपात एक बिबट्या दिसला, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गोरेगावच्या आरे जंगलालगतच्या भागात पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन होऊ लागल्यानं लोकांची घाबरगुंडी उडाली आहे. रात्रीच्या सुमारास बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर आता पुन्हा दिवसाढवळ्याही बिबट्या आढळून आला तर काय करायचं, असा प्रश्नही लोकांना सतावू लागलाय.

आरेच्या जंगलात बिबट्या अनेकदा दिसून आला आहे. याआधी आरेतील रहिवाशांवर झालेले बिबट्याचे हल्लेही कॅमेऱ्यात अनेकदा कैद झाले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा या परिसरात बिबट्या दिसून आल्याने भीतीचं वातावरण पसरलंय. नुकत्याच समोर आलेल्या बिबट्याच्या व्हिडीओमध्ये एका कारचे हेडलाईट बिबट्यावर पडताना दिसत आहे, यावेळी बिबट्या रात्री हिरवळीत लोळताना आणि विश्रांती घेताना दिसत होता. बिबट्यावर गाडीचा प्रकाश पडताच तो विचलित झाला आणि वाहनाकडे बघत जागा झाला. व्हिडीओमध्ये काही सेकंद बिबट्या वाहनाकडे टक लावून पाहत होता. यावेळी बिबट्यानं कोणावरही हल्ला केला नाही, मात्र बिबट्या आक्रमक होऊ शकला असता आणि त्यामुळे वाहनचालकाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “आयुष्य एवढं सहज मिळतं का ?” रीलसाठी तरुणानं उंच पुलावरुन मारली उडी; पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का

हा व्हिडीओ ranjeetnature नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडीओला “रात्री उशिरा आरे मिल्क कॉलनीच्या जंगलात एक बिबट्या आराम करताना दिसला”, असे कॅप्शन दिले आहे. दरम्यान, बिबट्या आढळून आल्यामुळे आता या भागातील वन कर्मचारीही सतर्क झाले आहेत. तसेच लोकांनाही सतर्क राहण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचंही आवाहन करण्यात आलंय.

बिबट्याच्या वावर असणाऱ्या क्षेत्रात रहिवाशांनी काय काळजी घ्यायची ?

१. संध्याकाळच्या वेळेस राहत्या घराच्या अंगणात किंवा परिसरामध्ये लहान मुलांना एकटे सोडू नये.

२. बिबट्या उजेडाला दचकतो, यामुळे रात्रभर घराबाहेर लाइट चालू ठेवावेत.

३. जिथे बिबट्या दिसतो त्या परिसरात त्या काळात शक्यतो समूहाने बाहेर जावे-यावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४. बिबट्या समोर आल्यास जोरात आरडा ओरड करावी व त्याला पळवून लावावे. त्यावेळी घाबरून जाऊ नये, तसेच खाली वाकू नये. खाली वाकल्यास तो हल्ला करू शकतो.