Mumbai local shockin video: मुंबईची जीवनवाहिनी म्हणून लोकल ट्रेनचा उल्लेख केला जातो. दररोज हजारो प्रवासी या लोकलने प्रवास करत असतात. असं म्हणतात मुंबईचं काळीज ही मुंबईची लोकल आहे. लोकल ट्रेन बंद पडली तर मुंबईच थांबते. जी २४ तास लोकांच्या सेवेत अविरत चालू असते. उन्हाळा असो किंवा पावसाळा प्रत्येक ऋतूत ती आपली साथ सोडत नाही. शिवाय न थकता आपल्या मुक्कामापर्यंत सुरक्षित पोहचवते. मुंबईची लोकल ट्रेन आणि गर्दीची सवय आता लोकांना झाली आहे. या गर्दीतून वाट काढत मुंबईकर दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करतो.मात्र सध्या समोर आलेला मुंबई लोकलमधल्या एका व्हिडीओने सर्वांनाच धडकी भरली आहे. अशी ही मुंबईचा जीव असणारी लोकल ट्रेन सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. याचं कारण असं की, आज बोरिवलीहून -चर्चगेटकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला.

सकाळच्या वेळेस मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करणं किती तापदायक आहे, हे काही वेगळं सांगायला नको. अफाट गर्दीतून मार्ग काढत डब्यात शिरण्याचा संघर्ष करावा लागतो. मात्र विचार करा अशाच गर्दीच्या वेळी तुम्ही लोकलमध्ये शिरलात आणि तुमच्या पायाखाली रक्तच रक्त असेल तर. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की असं नेमकं घडलं तरी काय?

तर झालं असं की, ५ तारखेला मंगळवारी सकाळी ८.३४ च्या बोरिवली-चर्चगेट ट्रेनमध्ये असाच धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, संपूर्ण डब्यात रक्त सांडलेलं दिसत आहे, काही प्रवाशांनी त्यावर कागद टाकले आहेत. हे रक्त नक्की कुणाचं आहे, या डब्ब्यात नेमकं काय घडलं याबाबत कुणालाही माहिती नाही. मात्र काहीजण असा दावा करत आहेत की हे रक्त सकाळ मासे विकायला येणाऱ्या कोळीनींच्या माशांचं आहे. मात्र हा व्हिडीओ पाहता काहीही स्पष्ट होत नाहीये. आणि या सगळ्यात ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ mack_and_peace नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, बापरे हा काय प्रकार आहे नक्की? कुणी सांगेल का? तर आणखी अनेकांनी हे रक्त मच्छीचं आहे असा दावा केलाय.