मुंबई लोकल म्हणजे मुंबईकरांसाठी जणू दुसरं घरच. दिवसभरातील अर्धावेळ प्रवासात जातो. लोकल म्हणजे मुंबईकर आणि मुंबईच्या आसपास वसलेल्या शहरवासीयांसाठी लाइफलाइनच आहे. मुंबई लोकलमधून रोज हजारो लोक प्रवास करतात. यावेळी कित्येक अनोळखी चेहरे हे एकमेकांचे घट्ट मित्र होतात आणि नव्याने मैत्रीचा प्रवास सुरु होतो. ऑफिसमधला सगळा थकवा लोकलमध्ये गप्पा मारत, गाणी गात घालवला जातो. मुंबई लोकलचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर पाहिले जातात. या मुंबई लोकलमधील दुनियाच काही औरच आहे. या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला याचा अनुभव येतो. दरम्यान असाच काही प्रवाशांचा गाणं गातानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘दो घुंट’ गाण्यावर वृद्धांची धमाल :
या व्हायरल व्हिडिओमध्ये प्रवासादरम्यान काही मुंबईकर बॉलीवूडच्या ‘दो घुंट मुझे भी पिला दे शराबी’ या हिट गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. यावेळी काही वृद्ध व्यक्तीही तरुणांसोबत नाचताना दिसत आहेत. यामध्ये एक वृद्ध आजोबा वयाचं बंधन झुगारुन गाण्याचा आनंद घेताना दिसत आहेत तर एक काका या गाण्याला म्युझिक देण्यासाठी चक्क लोकल डब्याच्या खिडकीजवळील पत्रा वाजवत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही नक्कीच खूश व्हाल.
पाहा मुंबईकरांचं स्पिरीट –
हेही वाचा – Video: मुलं निवडायची, लग्न करायचं, पाकिस्तानच्या कॉलेजमधील ‘ही’ भलतीच प्रथा होतेय viral; दरवर्षी पदवीआधी…
हा व्हिडीओ_aamchi_mumbai_नावाच्या एका इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ लाखो मुंबईकरांच्या पसंतीस उतरला आहे, अनेकांनी यावर प्रतक्रिया देत हेच मुंबईकरांचं स्पिरीट आहे असं म्हंटलंय. या व्हिडीओला आतापर्यंत ८ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.