Mumbai local viral video: मुंबई लोकलमधून रोज लाखो मुंबईकर प्रवास करत असतात. गर्दीत प्रवास करत घर ते ऑफिस अन् ऑफिस ते घर गाठत असतात. सध्याच्या काळात मुंबईकरांना प्रवासासाठी लोकलचा वापर करणं अत्यंत सुलभ आणि सोपं मानलं जातं. शहराच्या कोणत्याही भागात जाण्यासाठी मुंबईकर प्राधान्याने लोकल रेल्वेचा वापर करतात. परंतु, रेल्वेतून प्रवास करत असताना अनेक लोक डान्स, कला, रील्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ शूट करणं पसंत करत असतात. सोशल मीडियावर असे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये एका तरुणीनं लोकलमध्ये भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थिरकायला लागाल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही तरुणी लोकलच्या डब्यात “रडू नको बाळा मी पाण्याला जाते” या मराठमोळ्या गवळणीवर डान्स करत आहे. वारकरी सांप्रदायिक भजनाच्या परंपरेत भजनाच्या उत्तरार्धात ‘गवळणी’ म्हणण्याची परंपरा आहे. भजन संगीताच्या अंगाने, तत्त्वज्ञानाच्या अंगाने आणि वाङ्मयीन भूमिकेतूनही ‘गवळण’ हा प्रकार संत साहित्याच्या प्रासादिक दालनात लोकप्रिय झाला आहे. घायाळ अदा आणि लोककलेचा डौलदार लहेजा मिरवत या तरुणींनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकुळ घातला आहे, या तरुणींचा डान्स, पेहराव आणि श्रृगांर पाहून तुम्हीही म्हणाल की हे अस्सल मराठी सौंदर्य आहे. या तरुणीनं सुंदर सादरीकरण केलं आहे.

सोशल मीडियामुळे अनेक कलाकार नव्याने घडू लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, अशाच काही महिलांच्या डान्स व्हिडीओची संपूर्ण सोशल मीडियावर चर्चा आहे.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ bhavna_walunj नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. यावर नेटकरीही भरभरून कमेंट करत आहेत. यावेळी एका युजरने म्हंटलं, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अशीच जपा. तर दुसऱ्या युजरने कमेंट केली “जबरदस्त ठसका”