Virar local viral video: मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह असंख्य मराठा आंदोलकांनी गेल्या आठवड्यात मुंबई गाठली. आझाद मैदानासह आजूबाजूच्या परिसरात सलग तीन दिवस मराठ्यांनी आंदोलने केली. या दरम्यान काही मराठा तरुण मुंबई फिरण्याच्या निमित्ताने लोकल ट्रेनने प्रवास करत होते. यावेळी ते चुकून विरार लोकलमध्ये महिला डब्ब्यात शिरले आणि त्यानंतर काय झालं तुम्हीच पाहा. या आंदोलनाच्या निमित्ताने राज्यभरातील हजारो मराठा बांधव मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट परिसरात एकत्र आले होते. गेल्या आठवड्याभरात या मराठा आंदोलकांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. यापैकीच एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

मुंबईत लोकल ट्रेननं प्रवास करणं काही सोपं काम नाही. अन् त्यात जर का तुम्ही विरार लोकलनं प्रवास करत असाल तर मग काय विचारायलाच नको. कारण विरार ट्रेनला इतकी प्रचंड गर्दी असते की मुंगीलासुद्धा पाय ठेवायला जागा मिळत नाही. अशा स्थितीत लोकं बसण्यासाठी नाही तर चक्क उभं राहण्यासाठी सुद्धा हाणामारी करतात. मुंबई लोकलनं प्रवास करणं काही सोपं काम नाही. दर मिनिटाला हजारो प्रवासी मुंबई लोकलमधून प्रवास करतात. त्यामुळे अर्थातच या प्रवाशांमध्ये धक्काबुक्की किंवा भांडणं वगैरे होणं ही एक सामान्य गोष्ट आहे. पण सध्या एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे यामध्ये महिलांच्या डब्ब्यात चक्क पुरुष चढले आहेत..विरार लोकलमधील हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

हे पाहताच महिला प्रवासी भडकल्या आणि त्यांच्यावर टीका करू लागल्या. पण विशेष बाब म्हणजे या तरुणांच्या मदतीसाठी खुद्द एक महिलाच पुढे आली. “महिला जेव्हा पुरुषांच्या डब्यात चढतात, तेव्हा त्यांना सांभाळून घेतले जाते, त्यांना बसण्यासाठी जागा करून दिली जाते. पण एक पुरुष चुकून चढला, तर तुम्ही थोडा वेळ शांत बसू शकत नाही का?” असा थेट सवाल तिने आरडाओरडा करणाऱ्या महिलांना केला. हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा यात नेमकी चूक कुणाची ?

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ virarmerijaan नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत तरुणीचं कौतुक करत आहेत. एकानं म्हंटलंय, “याला म्हणतात संस्कार…धन्य ते आई वडील” दुसरा म्हणतो, “परफेक्ट उत्तर दिल आहे ह्या मुलीने, या असल्या काही वाचाळ बायकांना उगीच बाईपणाचा आव आणायचा असतो, लेडीजला गर्दी दिसली की लगेच घुसतात पुरुषांच्या कम्पार्टमेंटमध्ये तेव्हा यांना असुरक्षित वाटणार नाही.” तर आणखी एकानं, “धन्यवाद या ताईचे पुरुषाच्या बाजूने भांडली त्याबद्दल”