Mumbai Local AC Train Viral Video: मुंबई लोकलच्या एसी ट्रेन लाँच झाल्यापासून सुरुवातीचे काही दिवस रेल्वे प्रशासनाच्या वाट्याला आलेला ‘पांढरा हत्ती’ ठरल्या होत्या. एसी लोकलमध्ये हातावर मोजण्याइतकेच प्रवासी प्रवास करू शकत होते. पण मग रेल्वेकडून या लोकलच्या तिकीट दरात काहीसा बदल करण्यात आला आणि आता लोकलच्या सेकंड क्लास डब्यातील गर्दीला मागे टाकेल इतकी गर्दी एसी लोकलला सुद्धा होऊ लागली आहे. अशातच अलीकडे दोन दिवस प्रचंड पाऊस सुरु असल्याने लोकही मिळेल त्या ट्रेनने प्रवास करण्याची जोखीम उचलत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या दहिसर स्टेशनवरील एसी लोकलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

योगेश दाते यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला हा व्हिडीओ मुंबईचे अपडेट्स देणाऱ्या बहुतांश ट्विटर हॅण्डलवर तुफान चर्चेत आहे. तुम्ही पाहू शकता की, यामध्ये एसी लोकलच्या दरवाजाच्या बाहेरपर्यंत प्रवाशांची गर्दी जमली आहे. आता बाकी लोकल ट्रेनप्रमाणे दरवाजा उघडा ठेवून एसी लोकलचा प्रवास होत नसल्याने जोपर्यंत दरवाजा बंद होत नाही तोपर्यंत ट्रेनला पुढे सरकणे सुद्धा शक्य होत नाहीये. बरं ही स्थिती बघून ट्रेनमधून एक दोन प्रवासी माघार घेतील आणि खाली उतरतील अशी अपेक्षाही नाही. अशावेळी स्टेशन हमाल व पोलीस कर्मचारी तिथे येऊन चक्क हाताने प्रवाशांना ट्रेनमध्ये कोंबण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे या दोघांचे प्रयत्न बघण्यासाठी स्टेशनवर निवांत बसलेला एका बिचारा जीव सुद्धा तिथे येऊन उभा राहिला आहे.

Florida woman’s pet dog scares off alligator Nail-biting video is viral
“क्या मगरमच्छ बनेगा रे तू!” कुत्र्याला पाहून मगरीने ठोकली धूम, पळत जाऊन तळ्यात मारली उडी! पाहा Viral Video
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड

Video: हेच का मुंबईकरांचं स्पिरिट?

हे ही वाचा<< मुंबई लोकलमध्ये ‘आई’ने बाळासाठी लावली डोक्याची बाजी; Video पाहून लोकं म्हणाली, “मराठी बाई म्हणजे…”

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. खरंतर वर वर पाहिल्यास ही सगळी परिस्थिती पाहून हसायलाच येईल पण नीट विचार केल्यास या प्रवाशांची होणारी दैना तुम्हालाही थक्क करेल. रोज लाखो प्रवासी अशाच प्रकारे जीव धोक्यात घालून मुंबईत प्रवास करत असतात, एरवी मुंबईकरांचं स्पिरिट म्हणून गौरवली जाणारी ही बाब चिंतनीय आहे.