देशात लव्ह जिहाद सारख्या मुद्द्यांवरुन अधुमधून गदारोळ सुरु असतो. कट्टरवादी लोकांना हिंदू-मुस्लिमांचा आंतरधर्मीय विवाह मान्य नसतो. मात्र, सध्या हिमाचल प्रदेशमधील अशा एका लग्नाची बातमी समोर आली आहे, जी वाचून अनेकांनी देशात आजही हिंदू-मुस्लिमांमध्ये सलोख्याचं वातावरण असल्याचं म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर येथील एका हिंदू मंदिरात मुस्लिम मुलगा आणि हिंदू मुलीचा मुस्लीम पद्धतीने लग्न सोहळा पार पडला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या विवाह सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) और विश्व हिंदू परिषद (VHP) चे पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यांनीदेखील या दाम्पत्याला आशीर्वाद दिले. त्यामुळे सध्या या लग्नाची देशभरात चर्चा सुरु असून अनेकांनी याचं कौतुक केलं आहे.

नवरा मुस्लिम वधु हिंदू –

हेही पाहा- घरातून ऑफिसला निघालेल्या व्यक्तीला लिफ्टजवळच मृत्यूने गाठलं; हृदय पिळवटून टाकणारा Video व्हायरल

शिमला जिल्ह्यातील रामपूर येथे सत्यनारायण मंदिरात पार पडलेल्या विवाह सोहळ्यातील नवरा हा मुस्लिम असून तो सिव्हिल इंजिनियर आहे. तर वधू हिंदू एमटेक इंजिनियर आहे. सत्यनारायण मंदिराला लागूनच एक मशीद आहे. परंतु वधू-वरांनी मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्हीकडील वऱ्हाड मंदिरात येताच त्यांचे पारंपारिक हिंदू पद्धतीने स्वागत करण्यात आले. मात्र, लग्न हिंदू पद्धतनीने न करता एक मौलवी दोन वकील आणि साक्षीदारांच्या उपस्थितीत कुराणातील आयात म्हणत विवाह सोहळा पार पडला.

हेही पाहा- २० रुपयांसाठी गरीब रिक्षावाल्याला भररस्त्यात केलं उभं; माणुसकीला काळीमा फासणारी घटना आली समोर

या लग्नाला हिंदू संघटनांनी पाठिंबा दिल्याच्या मुद्यावर मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस विनय शर्मा म्हणाले, “मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी विश्व हिंदू परिषदेकडे आहे आणि मंदिर परिसरात आरएसएसचे कार्यालयही आहे. शिवाय RSS वर मुस्लीमविरोधी असल्याचा आरोप केला जातो, अशा परिस्थितीत हा विवाह सोहळा सांप्रदायिक सौहार्दाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर हा विवाह वधूचे वडील महेंद्र सिंह मलिक यांच्या परवानगीने झाला असून त्यांनी या विवाह सोहळ्याची सर्व तयारी केली होती. लग्नात प्रत्येक धर्माचे लोक सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. विहिंप आणि मंदिर ट्रस्टकडून मिळालेल्या सहकार्याचे त्यांनी कौतुक केलं. या विवाहाच्या माध्यमातून रामपूरच्या लोकांनी समाजात बंधुभावाचा संदेश दिला असल्याचंही मुलीच्या वडिलांनी सांगितलं.