Hindu-Muslim Unity : नुकताच अयोध्येत राम मंदिर उद्घाटनाचा उत्सव पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानिमित्त देशभरात उत्सव साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आली होती. राम भक्त ढोल ताशाच्या गजरात आनंद उत्सव साजरा करताना दिसले.सध्या असाच एक शोभायात्रेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुस्लीम बांधव फुलांची उधळण करताना दिसत आहे. हिंदू मुस्लीम ऐक्याचं दर्शन घडवणारा हा व्हिडीओ अनेकांना आवडेल.

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशात अनेक धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. अनेकदा हिंदू मुस्लीम ऐक्यावर प्रश्न उपस्थित केला जातो पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हिंदू मुस्लीम एकतेचे दर्शन घडेल. हिंदू मुस्लीम ऐकता जोपासण्याचा नेहमी प्रयत्न केला जातो. या व्हिडीओमध्ये तुम्हाला हेच दिसून येईल. मुस्लीम बांधव ज्या प्रकारे प्रभू रामाच्या शोभायात्रेत सहभागी झाले, ते पाहून तुम्हीही भारावून जाल. सोशल मीडियावर हिंदू मुस्लीम बांधवांच्या मैत्रीचे असे अनेक व्हिडीओ लोक आवर्जून शेअर करतात.
हा व्हायरल व्हिडीओ एका शोभायात्रेतील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला काही मुस्लीम बांधव दिसतील. ते शोभायात्रेत सहभागी झालेले दिसत आहे. त्यांच्या हातात फुले आहेत आणि ते शोभायात्रेत फुलांची उधळण करताना दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून तुम्हाला जाणवले की ते सुद्धा खूप उत्साही आहे. सध्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा सुरू आहे.

Fraud, Fraud with youth,
प्रेमाच्या जाळ्यात अडकून तरुणाची दीड लाखांची फसवणूक
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..

हेही वाचा: Video : ही दोस्ती तुटायची नाय! म्हातारपणातही आजोबा जपताहेत मैत्री, शेतकरी राजाच्या घरातील व्हिडीओ व्हायरल

sun_kaha_chale या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हीच भारताची खरी सुंदरता आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अशा मुस्लीम बांधवाना खूप मोठा सलाम” तर एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ पाहून मला मुस्लीम असण्याचा अभिमान वाटतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे खरे भारतीय आहेत” अनेक लोकांनी या व्हिडीओवर ‘जय श्री राम’ चा जयघोष केला आहे.