Viral wedding card: अनेकांचा लग्नात काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न असतो. त्यात लग्नपत्रिकाही अपवाद नाहीत. कधी लग्नपत्रिकाच विचित्र असते; तर कधी त्यातील मजकूर. अशा कितीतरी लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. त्यात आता आणखी एका लग्नपत्रिकेची भर पडली आहे. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत बऱ्याच लग्नपत्रिका व्हायरल झाल्या आहेत. आतासुद्धा अशाच एका कार्डनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही लग्नपत्रिका पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुस्लिम बापाकडून लेकीच्या लग्नात हिंदूंसाठी खास निमंत्रण

यूपीमधील अमेठीमध्ये एका मुस्लीम कुटुंबातील मुलीच्या लग्नाचं कार्ड सध्या खूप चर्चेत आहे. ही लग्नपत्रिका चर्चेचा विषय होण्याचं कारण म्हणजे त्यावर छापलेला फोटो. ज्यांनी हा फोटो पाहिला, त्यांना आश्चर्य वाटलं. त्याचं झालं असं की, एका मुस्लीम मुलीच्या लग्नपत्रिकेवर चक्क हिंदू देवी-देवतांचे फोटो होते आणि त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडला की यामागचे कारण काय?

ही पत्रिका तुम्ही पाहू शकता की, लग्नपत्रिकेवर गणपती बाप्पा आणि श्रीकृष्णाचं चित्र छापलेलं आहे. या कार्डमधील वधूच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे मुस्लीम आहेत; परंतु कार्डवर सर्व हिंदू देवतांचे फोटो छापलेले आहेत. या लग्नाची तारीख ८ आहे. शब्बीर ऊर्फ ​​टायगर, असे नवऱ्याच्या वडिलांचे नाव असून, त्यांची मुलगी सायमाच्या लग्नाच्या शुभ मुहूर्तासाठी त्यांनी हे कार्ड छापले आहे. दरम्यान, हे लग्न ८ नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडलं. सायमा बानो, असं या मुलीचं नाव आहे आणि तिचं लग्न नुकतंच पार पडलं.

लग्नपत्रिकेवर हिंदू देवी-देवतांचे फोटो छापण्याचे कारण काय?

या व्हायरल लग्नपत्रिकेबाबत मुलीचे वडील शब्बीर ऊर्फ टायगर आणि मुलगा रमजान यांना विचारले असता, त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. आपल्या हिंदू बांधवांना निमंत्रित करण्यासाठी हिंदू रीतीरिवाजानुसार कार्डं छापण्यात आल्याचे वडिलांनी सांगितले. राजापूर आणि फत्तेपूर गावात अनेक ठिकाणी आम्हाला हिंदू बांधवांना निमंत्रित करावं लागलं म्हणून आम्ही विचार केला की, त्यांच्यासाठी हिंदू रीतीरिवाजांनुसार कार्ड का छापू नये, आम्ही कुटुंबातील नातेवाईक आणि मुस्लिमांसाठी उर्दूमध्येही कार्डं छापली होती. आमच्या मुलीच्या लग्नाला हिंदू बांधवांना आमंत्रित करण्यासाठी आम्ही असे कार्ड छापले”, असं म्हणत त्यांनी हिंदू रीतीप्रमाणे लग्नपत्रिका छापण्याचं कारण सांगितलं.

पाहा लग्नपत्रिका

हेही वाचा >> VIDEO…अन् ‘तो’ चक्क कुत्र्याला कचाकचा चावला; हल्ला करताच रागावलेल्या तरुणानं घेतला बदला, पण शेवट…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुस्लिम विवाहाच्या हिंदू परंपरेनुसार छापण्यात आलेल्या या कार्डमुळे समाजासमोर हिंदू-मुस्लीम ऐक्याचे उदाहरण नक्कीच समोर आलं आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देणारं हे लग्नकार्ड व्हायरल होत आहे आणि त्याचं कौतुकही होत आहे.