Chandrayaan-3 : काही दिवसापूर्वी भारताने चांद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण केले. यानंतर चांद्रयान-३ आणि इस्त्रोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू होती. आता मात्र चांद्रयान-३ पुन्हा एकदा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर एका रहस्यमय वस्तूचे काही फोटो व्हायरल होत आहे आणि ही रहस्यमय वस्तू चांद्रयान-३ चे अवशेष असल्याचा दावा केला जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या समुद्र किनाऱ्यावर ही रहस्यमय वस्तू आढळली आहे.
या व्हायरल फोटोमध्ये एक रहस्यमय वस्तू दिसत आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्स ही वस्तू चांद्रयान-३ चा एखादा अवशेष असल्याचा दावा करत आहे. अनेक युजर्सनी हे फोटो शेअर करत प्रश्न विचारले आहे. ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी सापडलेल्या या वस्तूची ऑस्ट्रेलियाच्या स्पेस एजन्सीने तपासणी केली.
हेही वाचा : बापरे! हिरवळ पाहत शेतात बसला होता तरुण, अचानक मागे आला साप अन्…थरारक व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले
हा दावा खरा आहे की खोटा?
ऑस्ट्रेलियाच्या स्पेस एजन्सीने या वस्तूची तपासणी केल्यानंतर यासंबंधी ट्विट करत सांगितले, “ही वस्तू एखाद्या रॉकेटचा पार्ट असण्याची शक्यता आहे. आम्ही रॉकेटचा प्रकार आणि माहिती जाणून घेण्यासाठी जागतिक पातळीवर समकक्षांना संपर्क साधणार आहोत.”
हेही वाचा : Video : संयमी कसे व्हावे हे ‘या’ कुत्र्याकडून शिका! तोंडात छत्री घेऊन मालकाची बघतोय वाट; व्हिडीओ एकदा पाहाच
एका रिपोर्टनुसार ही रहस्यमय वस्तू PSLV रॉकेटचा पार्ट असू शकतो, असे म्हटले जात आहे. शिवाय या रिपोर्टमध्ये असाही दावा केला आहे की हा पार्ट चांद्रयानशी संबंधीत नाही. रिपोर्टमध्ये असा दावा केला आहे की जेव्हा एखादे रॉकेट लॉन्च केले जाते तेव्हा रॉकेटच्या भागांचे विभाजन केले जाते. रॉकेट जेव्हा उंच जातो, तेव्हा वजन कमी करण्यासाठी हे पार्ट वेगवेगळे होतात. सुरुवातीच्या दोन टप्प्यात लॉन्च केलेले भाग दूरवर समुद्रात पडतात. कदाचित तिसरा टप्पा ऑस्ट्रेलियाच्या जवळ पडला असावा, असा दावा केला जात आहे परंतू याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.