जगभरात असे लाखो जीव आहेत, ज्याबद्दल अनेकांना फार कमी माहिती आहे. यात असे सागरी प्राणी आहेत जे आपण कधी पाहिलेलेही नसतात, पण ते समोर आल्यानंतर आपल्याला ‘पळता भुई थोडी’ होते. अशाच एका नदीतील प्राण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून आपल्या अंगावरही काटा आल्याशिवाय राहणार नाही. व्हायरल व्हिडीओमध्ये एक माणूस एका नदीच्या काठावर उभा राहून मासे पकडण्यासाठी जाळे फेकतो पण यानंतर जाळ्यात असा काही एक भयानक मासा अडकतो, जो पाहून तुम्हालाही भीती वाटल्याशिवाय राहणार नाही.

कोणी म्हणतंय कॅट फिश तर कोणी म्हणतंय साप…

व्हिडीओमध्ये तुम्हा पाहू शकता की, मासेमारी करणारा माणूस नदीकाठी उभा राहून जाळे फेकतो आणि त्यानंतर वेगाने ते ओढतो. यानंतर जाळे खूप वेगाने त्याच्या दिशेने येताना दिसते. त्याच वेळी एक महाकाय मासा त्याच्या जाळ्यात अडकलेला दिसतो. हा भयानक हिंसक मासा पाण्यातून बाहेर येताच मच्छीमार जोरात ओरडतो. सुरुवातीला असे दिसते की हा एक मोठा मासा आहे, परंतु अनेक युजर्स असा दावा करीत आहेत की, तो एक महाकाय साप आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओवर सोशल मीडिया युजर्सनी कमेंट करायला सुरुवात केली आहे. एका युजरने लिहिले की, ‘असे दिसते की, हा रहस्यमय प्राणी नसून कॅट फिश आहे;’ तर दुसर्‍या युजरने लिहिले की, एवढी चपळता पाहून असे वाटते की, तो साप होता. आणखी एका युजरने लिहिले, ‘इतके मोठे मासे गोड्या पाण्यातही असतात का?’.

बटर चिकन, नान, अन्… चक्क एलॉन मस्क ही भारतीय पदार्थांच्या प्रेमात; म्हणाले….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @suddenlyhapend नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे, जो १ लाख ८ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती मासे पकडण्यासाठी जाळे पाण्यात टाकतो त्या वेळी त्याच्या जाळ्यात असे काही अडकते, जे पाहून मच्छीमार घाबरतो. मच्छीमाराला आधी वाटते की, त्याने एक मोठा मासा पकडला आहे. पण तो मासा नसून दुसरेच काही तरी असते.