पावसाळा हा अनेकांच्या आवडीचा ऋतू. रिमझिम पाऊस, कोसळणारे धबधबे, हिरवागार निसर्ग सगळं कसं आपल्याला अगदी हवं तसं वातावरण…अशा वातावरणात प्रत्येक जण रोमॅंटिक होऊन हा ऋतू साजरा करतात. फक्त माणसंच नव्हे तर प्राणी सुद्धा…होय. पावसाळ्यात रोमॅंटिक झालेल्या नाग-नागिणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. जवळपास दीड तासापर्यंत सुरू असलेल्या या नाग नागिणीचा प्रणय पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. दोघे नाग नागिण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

खरं तर, पाऊस सुरू होताच, नाग-नागिण त्यांच्या बिळातून बाहेर आले आणि सुमारे दीड तास एकमेकांना अलिंगन देत रोमान्स करताना दिसून आले. रोमान्स करता करता हे नाग-नागिण भर पावसाच डान्स देखील करू लागतात. हे पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी हा खास क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. पण असे दृश्य क्वचितच पहायला मिळतात. हे नाग-नागिण एकमेकांना अलिंगन देत एकमेकांभोवती गुंडाळलेले या व्हिडीओत दिसत आहे. नर आणि मादी दोन्ही नाग बराच वेळ एकमेकांना चिकटून राहतात. रोमान्स करणाऱ्या या नाग आणि नागिणीचं एक अनोख प्रेम पाहायला मिळालं.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : एक दोन नव्हे तर तब्बल २७ जण रिक्षामध्ये बसले होते, पाहून पोलीस सुद्धा चक्रावले

नाग-नागिणीचं हे प्रेम कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशमधल्या ललितपुरमधील मदवरा परिसरात रणगाव इथला हा व्हिडीओ आहे. रणगाव येथे रविवारी सायंकाळी पावसानंतर शेतात नाग-नागिणीची जोडी दिसल्याचे सांगण्यात आले. सुमारे दीड तास हा नाग आणि नागिण एकमेकांना चिकटून नाचत राहिले, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. कधी ही नाग-नागिणीची जोडी जमिनीवर पडायची तर कधी उड्या मारून मस्ती करायची.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : शेवटी आईचं काळीज! मुलाला वाचवण्यासाठी सुपरमॉम कारच्या हुडला चिटकून राहिली!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ट्रकचा हॉर्न वाजताच रस्त्यावर लोळत नागिन डान्स करू लागले तरूण, VIRAL VIDEO पाहून पोट धरून हसाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नंतर दोघेही आपापल्या बिळात निघून गेले. काही लोकांचे म्हणणे आहे की श्रावण महिना सुरू होण्याआधी अनेकदा नाग आणि नागिण नाचतात, तर काही लोक या घटनेकडे शुभ आणि अशुभ म्हणून पाहत आहेत. नाग-नागिणीचा हा रोमान्स सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. प्रत्येक जण हा व्हिडीओ सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.